========================
*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून रमेशजी बागला यांना बहुमान*===================
चंद्रपूर,दि.८ : कार्यकर्त्यांच्या परिश्रमानेच भाजपाने आज जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून लौकीक प्राप्त केला आहे, या आपल्या वक्तव्याची प्रचिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भाजपाच्या स्थापनादिनाला ध्वजारोहणाचा बहुमान ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशजी बागला यांना देऊन साऱ्यांचेच लक्ष वेधले.
=====================
एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगांना होणारे ध्वजारोहण कार्यकर्त्याच्या हस्ते व्हावे, हा दुर्मिळ प्रसंग आहे. मात्र ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यकर्त्यांप्रती असलेला जिव्हाळा पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने बघायला मिळाला. भाजपाच्या अत्यंत प्रतिकूल काळात चंद्रपूरचे भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला असे भाजपचे एकनीष्ठ कार्यकर्ते रमेशजी बागला यांना ध्वजारोहणासाठी आमंत्रीत करण्यात आले.भाजपच्या स्थापनादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रमेशजी बागला यांना ध्वजारोहणाचा मान दिला. त्यानंतर रमेशजी बागला यांच्या कार्याचा गौरवही त्यांनी केला.
=====================
‘रमेशजी बागला यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे भाजपाला आज सोनेरी दिवस बघायला मिळत आहेत. भाजप हा सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळेच एका सच्च्या कार्यकर्त्याला हा मान देताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे,’ असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. त्यानंतर शाल, भाजपचा दुपट्टा आणि भाजपचा ध्वज देऊन ना. श्री. मुनगंटीवार यांनी रमेशजी बागला यांचा विशेष सत्कारही केला.
=======================
भारतरत्न,माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,भाजपाचे जेष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांच्या समवेत जिल्हाच्या संघटन वाढीसाठी दौरे केले.आणीबाणी काळात जे कार्यकर्ते तुरुंगात होते त्याच्या कुटुंबाला आधार,मदत देण्याचं काम श्री.रमेशजी बागला यांनी केलं.त्यावेळी काँग्रेस सरकारने अतोनात त्रास देण्याचे काम भाजपा कार्यकर्त्याना केले तशा वातावरणात अविचलपणे,एकनिष्ठपणे कार्यकर्त्याना बळ देण्याचे काम बागलाजी यांनी केले.
====================
* चिमुकल्याच्या हाती भाजपचा ध्वज *
===================
बामणी येथे भाजपच्या स्थापना दिन कार्यक्रमात एक चिमुकला भाजपचा ध्वज घेऊन कार्यक्रमात सहभागी झाला होता. या चिमुकल्याचा उत्साह वाढविण्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे आले. त्यामुळे साऱ्यांनीच या चिमुकल्याचे कौतुक केले. भाजपा स्थापना दिन. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांनाच सन्मान प्रदान करणारा ठरला.======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793