* बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या उच्चशिक्षित समाज निर्मितीची स्वप्नपुर्ती करा – आ. किशोर जोरगेवार *

0
57

========================

* आमदार किशोर जोरगेवार यांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  *

=========================

 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवुन दिले. प्रत्येक गरजू विद्यार्थाला सोयी सुविधायुक्त अभ्यासिकेत निशुल्क अभ्यास करता यावा या करीता आपण चंद्रपूर मतदार संघात ११ अभ्यासिका तयार करत आहोत. यात पवित्र दिक्षाभुमी येथे १ लाख पूस्तकांचे संग्रह असणारया अभ्यासिकेचाही समावेश असून शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या उच्चशिक्षित समाज निर्मितीची स्वप्नपुर्ती करावी अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

========================

   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बहुजन विभाग महिला प्रमुख विमल कातकर, सायली येरणे, सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर संघटक विश्वजित शहा, हेरमन जोसेफ, राम जंगम बबलु मेश्राम, दूर्गा वैरागडे, निलिमा वनकर, कविता निखारे, माधुरी निवलकर, गुड्डू यादव, शंकर दंतुलवार, प्रविण कुलटे, वंदना हजारे, अॅड. राम मेंढे, अॅड. परमहंस यादव, कैलास धामनगे, बादल हजारे, किशोर बोलमवार आदींची उपस्थिती होती.

=========================

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शालेय शिक्षण घेतांना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली. पण यामुळे ते खचले नाही. त्यांनी अस्पृश्य आणि दिनदलितांचा उद्धार हेच जीवनाचे ध्येय ठरविले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. ते स्वत: उच्चशिक्षित झालेच. सोबतच त्यांनी समाजालाही शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांच्या संविधानीक अधिकारामुळेच आज मी आमदार बनु शकलो याची पुर्ण जाण मला आहे. आपण मतदार संघात ११ अभ्यासिका तयार करत आहोत. यातील सर्वात मोठी अभ्यासिका पवित्र दिक्षाभुमी येथे तयार होत आहे. यासाठी १ कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करुन दिला असुन १ लाख पुस्तकांचे संग्रह असणारी ही अभ्यासिका असणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here