+++++++++++++++++++++
+ वसुंधरा दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन
केतकी किनेकर व प्राची खारकर प्रथम *
+++++++++++++++++++++++
कलेच्या माध्यमातून समाजजीवन समृध्द करण्याचे मोलाचे कार्य संस्कार भारती अव्याहतपणे करीत आहे. विविध कलाप्रकारांना व कलाकारांना प्रोत्साहित करून त्यांच्या तील सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करून जे कार्य संस्कार भारती करीत आहे ते देशातील प्रत्येक संघटनेसाठी मार्गदर्शक असल्याची भावना एफ ई एस गर्ल्स हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर च्या मुख्याध्यापिका सौ संगीता बुटले यांनी व्यक्त केली.
++++++++++++++++++++++
संस्कार भारती चंद्रपूर द्वारे वसुंधरा दिन अर्थात भू अलंकरण दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर संस्कार भारती चे चित्रकला विधा प्रमुख किरण पराते , स्पर्धेचे परीक्षक संजय अंड्रस्कर, कार्तिक नंदूरकर , संकेत केतकर , अजय धवने , सौ संध्या विरमलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पराते यांनी केले.
या स्पर्धेत १२० शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा अ व ब अशा दोन गटात घेण्यात आली. स्पर्धेसाठी वसुंधरा रक्षण , पर्यावरण संवर्धन , पाणी वाचवा असे विषय देण्यात आले होते.
वर्ग ५ ते ७ अ गटात एफ ई एस गर्ल्स हायस्कूल च्या केतकी किनेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर बिजेएम कारमेल एकेडमी च्या जीविका हांडे हिने द्वितीय , महर्षी विद्या मंदिर च्या शर्वील पेडके तृतीय आणि बिजेएम कारमेल एकेडमी च्या श्लोक चेपूरवार ह्याला उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात आली. वर्ग८ ते १० ब गटात छोटूभाई पटेल हायस्कूल ची प्राची खारकर प्रथम , छोटुभाई पटेल हायस्कूल अविनाश ननावरे द्वितीय , बिजेएम कारमेल अकॅडमी ची गरिमा मनोज तृतीय व छोटुभाई पटेल हायस्कूल ची वैष्णवी नंदनवार उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना मानचिन्ह व प्रमाण पत्र देण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सुमारे १२० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. जागतिक पुस्तक दिनानिमित्त सौ संध्या विरमलवार यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक व वाचनाचे महत्व विशद करत मार्गदर्शन केले तर सौ जागृती फाटक यांनी वसुंधरा रक्षण या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
भू अलंकरण दिनानिमित्त रांगोळी विधा प्रमुख सुहास दुधलकर यांनी आकर्षक रांगोळी काढली होती. ही रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या वेळी संस्कार भारतीच्या नव्या अध्यक्ष म्हणून सौ संध्या विरमलवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सौ संध्या विरमलवार यांचे स्वागत करत त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या . या दरम्यान संस्कार भारतीच्या सदस्यांनी संस्कार भारती ध्येय गीत सादर केले. उद्घाटन सत्राचे संचालन जागृती फाटक यांनी तर समारोप सत्राचे संचालन प्रणाली पांडे यांनी केले. संस्कार भारती चे जिल्हा मंत्री मंगेश देऊरकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संस्कार भारती चे उपाध्यक्ष डॉ राम भारत, सचिव लिलेश बरदाळकर , प्रांत कुटुंब आयाम प्रमुख ऍड भावना हस्तक , राज ताटपल्लीवार, स्वरूपा जोशी आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.