*भारतीय जनता पार्टी जिल्हा-चंद्रपूर महानगरचे आयुक्तांना निवेदन *
*********************
* चंद्रपूर *
*********************
शहरामध्ये पाणी पुरवठा सुव्यवस्थीत करणेबाबत अनेक तक्रारी महानगर भाजपाला प्राप्त झाल्या नंतर याची दखल भाजपाने घेतली असून या संदर्भातील निवेदन भाजपा तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले.विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिल्याने अनेकांचा जीव सुखावला आहे.
आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत डॉ.मंगेश गुलवाडे म्हणाले,सद्या उन्हाळ्याचे दिवस असून सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गंभीरबाबीची दखल घेऊन चंद्रपूर शहरामध्ये सर्वत्र पाणी पुरवठा सुव्यवस्थीत करण्यात यावा.बंगाली कॅम्प येथे काही भागात एक ते दिड तास पाणी पुरवठा होतो, तर काही ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा होत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.त्यामुळे याबाबीची दखल घेऊन सर्वाना समान तत्वावर पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने डॉ.गुलवाडे यांनी केली.
यावेळी महानगर भाजपाचे महामंत्री राजेंद्र गांधी,सुभाष कासंगोट्टुवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे, अजय सरकार, मनोज सिंघवी, सचिन कोतपल्लीवार दिनकर सोमलकर,दिवाकर पुद्दटवार, कल्पना बगुलकर, प्रदीप किरमे, संदीप आगलावे, रेनुताई घोडेस्वार, मोनिषा महातव, प्रलय सरकार, संजय पटले, श्रीराम ईतडवार, प्रकाश बोटूवार, अनिल तंगडपल्लीवार, दिलीप बोटूवार, अशोक बोटूवार, नंदकिशोर बगुलकर यांची उपस्थिती होती.
*************************
पाणी ही मूलभूत गरज आहे.ही गरज भागविणे मनपाची जवाबदारी आहे.तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करावे अशी सूचना यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केली .