* विद्यार्थ्यांनो एक गाव दत्तक घ्या ! आई-वडिलांची सेवा करा आदर्श जीवनाची हीच खरी सुरुवात आहे *

0
40

—————————————-

जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती शाळेच्या तब्बल तीस वर्षानंतर शिंदे मंगल कार्यालयातील सभागृहात आयोजित
गुरुवर्य व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्यातून गावंडे सरांनी ग्राम उन्नतीचा दिला संदेश
—————————————-
एक आठवण अनोखी
मैत्रीचा ठेवा.
जिथे जातो तिथे तू माझा सांगाती

आदर्श दिवंगत गुरुवर्य महोदय व जीवाभावाचे सखे सोबती स्नेहांकित मित्र यांना स्नेहमिलन कार्यक्रमात वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली!
—————————————-
गुरुजनी ऐसे द्यावेत धडे।
आपला आदर्श ठेवूनी पुढे। विद्यार्थी तयार होता चहुकडे । राष्ट्र होई तेजस्वी ।।

—————————————-

एक तरी गाव दत्तक घ्या !एक खेड दत्तक घ्या आई-वडिलांची शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करा तुम्हाला खऱ्या अर्थाने सर्वांगीण उन्नतीचे सुखी जीवनाचे व जिद्दीच बळ मिळेल. मी आई-वडिलांची शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. स्वयंशिस्तीचे प्रेरणास्त्रोत धडे घेतले. एक शिक्षक म्हणून आदर्श विद्यार्थी निर्माण करण्यास व राष्ट्रीय कार्याच्या प्रत्येक जडघडणीत नागरिक तयार करण्यास थोडाफार हातभार लावता आला मी धन्य झालो. भद्रावती ऐतिहासिक नगरी व येथील प्रत्येक व्यक्ती व विद्यार्थी जिल्हा परिषद हायस्कूल माझी शाळा ,माझे सहकारी शिक्षक वृंद हा माझा संयुक्तिक मोठा परिवार आहे असे मी मानतो .या शहराशी माझे ऋणानुबंध जुडले आहेत .भद्रावतीने मला आपुलकी, जिव्हाळा, प्रेम खूप काही शिकवले. वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत असणारे आदर्श विद्यार्थी दिलेत. असे भावना स्पर्शी उद्गार उद्घाटन पर विद्यार्थ्यांची संवाद व्यक्त करताना माजी प्राचार्य जी. एम. गावंडे बोलत होते.
तब्बल तीस वर्षांनंतर
जिल्हा परिषद हायस्कूल गुरुवर्य व माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळा ही संकल्पना प्रत्यक्षात भेटीत उतरवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी गुगल व व्हाट्सअप च्या माध्यमातून तब्बल काही वर्षापासून एकत्रित रित्या प्रयत्न करीत अखेर ७ मे २०२३ला सदर स्नेह मिलन अविस्मरणीय सोहळा घडवून आणला. नोकरी, विविध क्षेत्रातील कामाच्या निमित्ताने विविध पदावर कार्यरत बाहेर असलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात राज्यस्तर ,जिल्हा, ग्रामीण स्तरावर वरून एकत्रित येत सदर सोहळा घडवून आणला. ही या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणावी लागेल
या स्नेह सोहळा कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य जी .एम .गावंडे, अध्यक्षस्थानी शामराव धांडे सर, तर विशेष प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त एम. पवार सर, संभाजी ताजने, प्रकाश कासर्रलवार, दिवाकर वासनिक, अशोकराव सावरकर माजी शिक्षणाधिकारी, राजेश श्रीवास्तव, ताराचंदजी भोयर, नालमवर मॅडम, भालेराव मॅडम ,नीलिमा शेंडेकर, निर्मला जीवने, उमरे मॅडम,
एम .डी .किटे मॅडम, शाळेची घंटा वाजवीत वेळेचे व शिस्तीचे पालन करायला लावणारे विद्यार्थ्यांचे प्रिय सेवानिवृत्त ज्येष्ठ ८२ वर्षीय शिपाई समशेर खांनजी पठाण, शिपाई महिला माडेकर बाई, बेलखुडे बाई आदी सर्वांचा याप्रसंगी शाल ,श्रीफळ, वस्तू स्वरूपात वाटर थर्मास व सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञता पूर्वक सन्मान करण्यात आला. प्रसंगी २०१९चंद्रपूर च्या (दुर्गापुर थर्मल पावर टेशन) महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कामगार पुरस्कार प्राप्त संतोष ताजणे या विद्यार्थ्यांचा सर्व गुरुवर्य मंडळीच्या हस्ते शाल शिफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद हायस्कूलच्या मागील ३०वर्षाचा कार्याचा मागोवा. जी.एम .गावंडे या नावाने ओळखली जाणारी शाळा व शाळेमधून घडलेली वर्ग मित्र- मैत्री, विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल राजकारण, समाजकारण, वरिष्ठ स्तरावर कार्यरत असलेले अधिकारी ,डॉक्टर, इंजिनीयर ,उद्योग व्यवसाय , प्रतिष्ठान या सर्वांची व्यक्तिगत व पारिवारिक ओळख व परिचय यानिमित्ताने झाली .
स्नेह मिलन सोहळ्यापूर्वी दिवंगत मसादे सर, सि.ए.मिश्रा सर, मारुती ताजणे सर, आर.टि. पिदुरकर सर, प्रकाश शेंडे सर वनकर सर, अंबुलकर मॅडम, आदर्श गुरुवर्य व वर्ग मित्र अब्दुल शेख ,रमेश दिवसे, सुनील भगत , रितेश भगतकर ,वैशाली बोरकर , विनोद वझे , शैलेश रामटेके सतीश नगराळे , शांताराम हिवाळे ,हेमंत मते , आपुलकीची जिव्हाळ्याची स्नेहांकित मित्र मंडळी आपण गमावली याची खऱ्या अर्थाने आठवण रवींद्र तिरानिक यांनी करून देत. उपस्थित मा.उद्घाटक , अध्यक्ष, प्रमुख अतिथी, स्नेहमिलन सोहळ्यातील सर्व मित्रांनी याप्रसंगी उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
‘या चिमण्यांनो परत फिरावे शाळेकडे आपल्या” हा संदेश जागृत करीत अनेक बालपणीच्या शालेय आठवणी सांगत चक्क शाळा बोलू लागली असे वाटत होते. सर्वांनी आपले याप्रसंगी मनोगत मांडलीत . प्रमुख उपस्थित गुरुवर्य मान्यवरांनी आपली मनोगत मांडीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला या स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून आमचा सन्मान झाला. आम्ही अक्षरासह भारावून गेलो आहोत हा संदेश सेवानिवृत्त गुरुवर्य शिक्षक- शिक्षिका सर्वांच्या तोंडून बाहेर पडला .
विद्यार्थ्यांनी भविष्यात दिशादर्शक कार्य करावे. कुटुंबातील दुसरी पिढी विविध स्तरावर वाटचाल करून उत्तम नागरिक म्हणून कशी निर्माण होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे हा संदेश गुरुवर्य महोदयांनी याप्रसंगी दिला.
या स्नेहमिलन सोहळ्याचे प्रास्ताविक सतीश कंदीवार यांनी केले. तर संचालन मनीषा उजवणे व आभार प्रदर्शन प्रशांत तुराणकर यांनी केले.
तीस वर्षानंतर सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयास ज्यांनी केला व अथक परिश्रम घेतलेत असे सतीश खेडेकर ,सतीश कंदीवार, संतोष ताजणे, राजेश गिरडकर, प्रशांत तुराणकर, अभय ठेपाले, रोशन इखार, मनीषा उजवणे, अमोल उपगंलनवार, किशोर दिवसे, रवींद्र शिंदे आदींनी अथक परिश्रम घेत सहकार्य केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी याप्रसंगी जिल्हा परिषद हायस्कूल ला भेट दिली.

———————————

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

———————————-

संपादक :- शशी ठक्कर 9881277793 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here