===================
*महेश नवमी पर्व उत्साहात साजरा करण्याचे जिल्हा संयोजक ललित कासट यांचे आवाहन*
*************************
महेश नवमी पर्व निमित्त २९ मे ला माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध समाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत महेश नवमी पर्व मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहण माहेश्वरी समाजाचे जिल्हा संयोजक ललित कासट यांनी समाज बांधवांना केले आहे.
*************************
दरवर्षी प्रमाणे यंदाही २९ मे ला महेश नवमी पर्व माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणार आहे. या निमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमीत्त समाज बांधवांच्या वतीने शहरातुन भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, समाज बांधवाच्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा संकल्प आदी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सोशल मिडीया बाबात जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गीत गायन, नृत्य स्पर्धा, सामाजिक नाटिका, वेशभुषा स्पर्धा, आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. यावेळी जनगणना, योग, संस्कार शिबीर आणि क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रसध्दि करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रातुन माहेश्वरी समाजाचे जिल्हा संयोजक ललीत कासट यांनी केले आहे. तसेच तालुकास्तरावरही समजाच्या वतीने महेश नवमी पर्व निमित्त धार्मिक, सामाजिक, क्रीडा आणि सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहनही ललित कासट यांनी केले आहे.
************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
***************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793