*****************************
*शासन आपल्या दारी उपक्रम, नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन*
***************************
शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षते खाली उद्या शनिवारला नियोजन भवन येथे चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागातील विकासकामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता सदर बैठक सुरु होणार आहे.
सदर आढावा बैठकीत चंद्रपूर मतदारसंघातील ग्रामीण भागांमधील समस्या जाणून घेत त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. नवीन विकासकामे, प्रलंबीत कामे, प्रकरणे, तक्रारी आदी विषयांकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व संबधित अधिकारी उपस्थित राहणार आहे.
******************************
ग्रामीण भागातील प्रश्न प्राथमीकेतेने सोडविण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. याच अनुषंगाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असुन मतदार संघातील ताडाळी, छोटा नागपूर, पिपरी, दाताळा, देवाडा, वेंडली, नागाळा सी, नकोडा, उसगाव, पडोली, कोसारा, मोरवा, बेलसनी, म्हातारदेवी, साखरवाही, धानोरा, सिदुर, पांढरकवडा, शेणगाव, सोनेगाव, वढा, मारडा, येरूर, विचोडा आदी ग्रामपंचायतींची आढावा बैठक उद्या शनिवारला नियोजन भवन येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी या आढावा बैठकीत उपस्थित राहुन शासनाच्या विविध योजनांची माहिती घेत गावातील समस्यांबाबत अवगत करावे असे आवाहण पंचायत समीती चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793