*वरिष्ठ संपादक, पत्रकार, प्रतिनिधी आणि फोटो जर्नालिस्ट* प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया

0
35

******************************

*मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टी बल्लारपुरचे निदर्शन*  

*********************************

* बल्लारपुर, *   

*****************************
मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

******************************

मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरता आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात डर का मोहोल असे वातावरण तयार केले आहे, आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाहीं, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.

*****************************

मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात व तालुका स्थरावर त्रिव निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम आदमी पार्टी बल्लारपुरने केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जि. संघठण मंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, प्रा. प्रशांत वाळके, सचिव ज्योती बाबरे, संघठण मंत्री रोहित जंगमवार, सह सचिव आशिष गेडाम, युथ अध्यक्ष सागर कांबळे, महिला अध्यक्षा किरण खन्ना, उपाध्यक्ष सलमा सिद्दिकी, नलिनी जाधव, सचिव शीतल झाडे, बेबी बुरडकर, राजू शेंडे, अतुल मडावी, महेंद्र चुनारकर, स्मिता लोहकरे, रेखा भोंगे, कविता हरबड़े, निशा नंदवंशी, रेबिका जांभूळकर, प्रजवल चौधरी आणि इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

*****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here