**************************
१९ ऑक्टोंबरला सुरु होणार पाच दिवसीय महाकाली महोत्सव, नियोजन बैठक संपन्न..
*******************************
मागच्या वर्षी प्रथमच पार पडलेल्या महाकाली महोत्सवात नागरिकांचा मिळालेला सहभाग उत्साह वाढविणारा होता. त्यामुळे यंदाच्या महाकाली महोत्सवाची चंद्रपूरकरांना प्रतिक्षा होती. यंदा १९ ऑक्टोंबरला आपण हे आयोजन करणार असून पंचमी ते नवमी पर्यंत असा पाच दिवस यंदाचा महोत्सव चालणार आहे. भक्तांकडून आलेल्या सुचनेतून व लोकसहभागातून यावर्षी महोत्सवाचे भव्य नियोजन करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
*******************************
१९ ऑक्टोंबरला सुरु होणार असलेल्या महाकाली महोत्सवाच्या नियोजनासाठी महाकाली मंदिर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे सचिव अजय जैस्वाल, सहकोषाध्यक्ष राजेश शास्त्रकार, सदस्य मिलींद गंपावार, डॉ. सुरेश महाकुळकर, वंदना हातगावकर, आशा महाकाले, सविता दंडारे, कुक्कु सहाणी, श्याम धोपटे, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष भरत शिंदे, मुक्कू सोनी, एमआयडीसी असोशीएशनचे अध्यक्ष मधूसुदन रुंगठा, डॉ. अशोक वासलवार, विवेकनगर राम मंदिराचे अध्यक्ष राजू चोपडे आदींची मंचावर उपस्थिती होती.
******************************
चंद्रपूर जिल्ह्याला आणि पर्यायाने चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराला पर्यटनाच्या दृष्टीने महत्व प्राप्त करुन देण्यासाठी मागच्या वर्षी अश्विन – शारदीय नवरात्री मध्ये चंद्रपूरात भव्य माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी हे आयोजन याच भव्यतेसह होणार असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले होते. यंदाही सदर आयोजन करण्यात येणार आहे. यंदा हे आयोजन १९ ऑक्टोंबरला होणार असून हे आयोजन पाच दिवस चालणार आहे. या संदर्भात महाकाली भक्तांच्या सुचना घेत नियोजन करण्यासाठी महाकाली मंदिर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महाकाली भक्तांनी अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहेत यात महोत्सवा दरम्यान शहरात भक्तीमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी विषेश व्यवस्था करण्यात येणार आहे. तर शहरातील अनेक भागातून देखावे शोभायात्रेत सहभागी होण्याच्या दिशेनेही यावेळी भक्तांनी सुचना केल्या आहे. लवकरच या संदर्भात दुसरी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला मोंटु सिंग, प्रा. श्याम हेडाऊ, प्रशांत दानव, प्रा. योगेश दुधपचारे, पंकज जैन, हरिश ससनकर, राजु जोशी, नंदराज जिवनकर, शरद व्यास, अरविंद सोनी, शैलेंद्र शुक्ला, संजय धारणे, संजय बेले, स्मिता रेभनकर, मनिषा पडगीलवार, मृनालीनी खाडीलकर, आशा सोनी, किरण भडके, डॉ. आसावरी देवतळे, नम्रता बंडावार, एकता पित्तुलवार, हेमांगिनी बिस्वास, प्रज्ञा जिवणकर, स्मिता चावडा, गायत्री मंदिर, पंतजली योग समिती, योग नृत्य परिवार, हंसभक्ती आश्रम, शहरातील विविध शिक्षण आघाडी ग्रुप, गरजा महाराष्ट्र गृप, नटराज डांन्स अँकेडमी, विविध गरभा दांडिया गृप, शहरातील व्यायाम शाळा सदस्य, गुरुदेव सेवा मंडळ, रोटरी क्लब, निर्मला माता गृप, विविध भजन मंडळ, दिव्यांग समूह यांच्यासह शहरातील धार्मीक, सामाजिक, सांस्कृतीक व क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
******************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793