****************************
दोन वर्षांपासून घरबांधकाम परवानगी साठी टाळाटाळ।
*************************************
विठ्ठल पुरी यांनी न प ला 5 लाख नुकसान भरपाई ची नोटीस बजावली ।
********************************
परवानगीशिवाय बांधकाम केले म्हणून द्वेषभाववणेतून एकतर्फी अन्यायपूर्ण कार्यवाही ।
*************************
येथील प्रभाग 5 मध्ये गांधी चौकलगत विठ्ठल पुरी यांच्या स्वतःच्या मालकीची जागा असून त्यांनी सण 2021 मध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून बांधकाम परवानगी न प कडे मागितली परंतु या पूर्वी त्यांनी या जागेसमोर द्वेषभवणेने सुरू केलेल्या न प च्या वाटर ए टी एम साठी कोर्टातून स्थगणदेश मिळविला होता त्याचा वचपा काढण्यासाठी जाणीवपूर्वक बांधकाम विभागाने वारंवार चकरा मारून सुद्धा परवानगी दिली नाही। नप च्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रे व अर्ज सादर केल्यावर साठ दिवसाचे आत परवानगी दिल्या गेली नाही तर अर्जदारास बांधकाम करता येते ।त्या अनुषंगाने विठ्ठल पुरी यांनी आपले बांधकाम सुरू केले होते। परंतु शेजारी हरीचंद्र काळे यांचा पूर्वी पासून वाद असल्याचे हेरून परवानगी साठी अर्ज केल्याची माहिती देण्यात आली व त्यांचा तक्रार अर्ज असल्याची बाब समोर करून विठ्ठल पुरी यांचे बांधकाम परवानगी रोखण्यात आली या साठी तत्कालीन मुख्याधिकारी डॉ विशाखा शेळके यांना वेळोवेळी यांना सुनावणी घेण्याची व कागदपत्रे पडताळणी करण्याची व तक्रादाराच्या खोट्या तक्रारी बाबत खुलासा सादर केला परंतु हेकेखोर मुख्याधिकारी यांनी कोणाचीही बाजू समजून घेतली नाही। त्या बाबत तक्रारकर्ता हरीचंद्र काळे यांनी लोकायुक्त यांचे कडे तर विठ्ठल पुरी यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्रालय यांच्याकडे मुख्याधिकारी विशाखा शेळके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती परंतु तिला राजकीय पाठबळ असल्याने तिच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। या उलट दोघांनाही अपमानास्पद वागणूक देण्यात आली।
परंतु त्यानंतर हरीचंद्र काळे यांनी पत्रव्यवहार करून मुख्यधिकारी विशाखा शेळके यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला। त्यात तिची बदली झाली । आता नव्याने रुजू झालेले मुख्यधिकारी डॉ संजय जाधव यांनी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तपासले असता सुनावणी ठेवली असता त्यात तक्रारकर्त्यांनी सार्वजनिक प्लॉट वर अवैध बांधकाम केल्याची खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले। परंतु बांधकाम परवानगी सुद्धा प्राप्त केली नसल्याने विठ्ठल पुरी यांनी केलेले बांधकाम भुईसपाट केले ।यामुळे विठ्ठल पुरी यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे।
पण खोटी तक्रार करणार्यांवर मात्र काहीच कार्यवाही झाली नसल्याने एकतर्फी व द्वेषभावणेतून ही कार्यवाही झाल्याचा आरोप उद्धव पुरी यांनी केला आहे।
विशेष म्हणजे सदर कारवाई पूर्वी दोन्ही गटात आपसी समजोता झाला असून तक्रारकर्ता हरुचंद्र काळे यांनी आपली तक्रार मागे घेण्यात यावी या साठी मुख्याधिकारी यांना विनंती केली होती । परंतु त्यांनी हरीचंद्र काळे ची विनंति फेटाळून लावली व दोघांवर समान कार्यवाही करण्यात येईल अशी भूमिका घेतली। पण परवानगी नाही म्हणून
विठ्ठल पुरी यांचे घर पाडले तर आजू बाजूच्यानी परवानगी न घेता बांधकाम केले त्यांचेवर का कार्यवाही केली नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे। गडचांदूर न प मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असून नगराध्यक्ष सविता टेकाम आहेत। या प्रकरणी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, आजी माजी बांधकाम सभापती , नगरसेवक यांनी लक्ष घालून समस्या सोडवावी अशी अनेकदा विनंती केली गेली पण पाणी कुठे तरी मुरत असल्याने ते सुद्धा न्याय देऊ शकले नाहीत।
नगरपरिषद स्थापन झाली पाहिजे यासाठी कित्येक वर्षे संघर्ष करून नगरपरिषद खेचून आणणारे गडचांदूर तालुका संघर्ष समिती चे मुख्य संघटक व सामाजिक कार्यकर्ते उद्धव पुरी यांच्या परिवारावरच नगरपरिषद ने अन्याय करून द्वेषपूर्ण कार्यवाही केली त्यामुळे शहरात नगर परिषद विरोधात रोष व नाराजी व्यक्त होत आहे।
आता गडचांदूर परीसारतील शेकडो विनापरवंगीने केलेल्या बांधकामावर व नियमबाह्य कामावर मुख्याधिकारी यांनी कार्यवाही करावी अशी मागणी उद्धव पुरी यांनी केली आहे। मुख्यधिकारी यांचेसोबत संपर्क साधला असता त्यांनी न प नियमानुसार सर्वांना समान न्याय दिला जाईल असे सांगितले। आता हे अधिकारी आपली कर्तव्यदक्षता दाखवून अनधिकृत बांधकाम पाडतील ते पाहण्यासाठी सुज्ञ नागरिक वाट पाहत आहेत । गडचांदूर मधील न प ची ही सर्वात मोठी व पहिली कार्यवाही असल्याने अवैध बांधकाम करणाऱ्यांचे या प्रकरणामुळे धाबे दणाणले आहेत हे विशेष।
**********************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
********************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793