ना.मुनगंटीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पालकमंत्री महारक्तदान यज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ना.मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम
रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राजकारणात नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या विद्यमान कॅबिनेट व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्ह्यातील हजारो लोकांनी रक्तदान करून रविवारी साजरा केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.
ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे संपूर्ण जिल्ह्यात ना.मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पालकमंत्री महा रक्तदान यज्ञाचे आयोजन करण्यात आले.यात चंद्रपूर,वरोरा,बल्लारपूर,पोंभु
राक्तदात्यांचे शपथपत्र चर्चेचा विषय
आयोजकांनी रक्तदात्यांसाठी एक शपथपत्र तयार केले.या शपथपत्रानुसार यानंतर हे रक्तदाते गरजूंना रक्तदान करून सामाजिक ऋण फेडणार आहेत.तसेच लोकजागृती करून इतरांनाही ते प्रोत्साहन देतील.सर्व रक्तदात्यांना शासकीय प्रमाणपत्र व ना.मुनगंटीवार यांचे एक अभिनंदन पत्र देण्यात आले.
यशस्वीतेसाठी यांनी केले परिश्रम
पालकमंत्री महा रक्तदान यज्ञ हे अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ मंगेश गुलवाडे,राहूल पावडे,हरीश शर्मा,राजेंद्र गांधी,प्रमोद कडू,प्रकाश धारणे,रवी लोणकर,सुभाष कासंगोट्टूवार,विठ्ठल डुकरे,विशाल निंबाळकर,सचिन कोतपल्लीवार,ब्रिजभूषण पाझारे,संदीप आगलावे,दिनकर सोमलकर,अजय सरकार,रामपाल सिंह,शैलेश दिंडेवार,डॉ संदेश गोजे व किरण बुटले यांनी परिश्रम घेतले.
आ.डॉ.रामदास आंबटकर यांनी थोपटली पाठ
महानगरात सकाळी 9.30 वाजता पालकमंत्री महा रक्तदान अभियान सुरू झाल्यावर चंद्रपुर,गडचिरोली व वर्धाचे विधानपरिषद सदस्य डॉ.रामदास आंबटकर यांनी दिवसभर शिबीर स्थळी भेट देऊन रक्तदात्यांची विचारपूस केली.यावेळी त्यांनी परिश्रम घेणाऱ्यांची पाठ थोपटली.
ग्रामीण चंद्रपूरातही झाले महा रक्तदान यज्ञ
महानगरात 8 ठिकाणी महा रक्तदान यज्ञ पार पडत असताना ग्रामीण भागातही रक्तदात्यांनी एकच गर्दी केली यात बल्लारपूर,गोंडपीपरी,मूल,जनासु
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793