*आप शहराध्यक्ष सुरज शहा*
आज दिनांक 31 जुलै 2023 रोजी वरोरा – भद्रावती विधानसभेचे आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आले की भद्रावती नगरपरिषद ची स्थापना सन 1997 या वर्षी झाली असून, त्यानंतर पासूनच भद्रावतीच्या जनतेकडून शिक्षण कर घेण्याची सुरुवात झाली. शिक्षण कर देऊनही सुद्धा भद्रावती मधे नगरपरिषद च्या एकही शाळा उभारण्यात आलेल्या नाही. लोकांना ही वाटू लागलं आहे की ज्याप्रमाणे आम्ही नगरपरिषद ला शिक्षण कर देतो त्याचप्रमाणे नगरपरिषद तर्फे सुद्धा आम्हाला शाळा मिळावी पण असे काही होत दिसत नाही. ज्या प्रमाणे दिल्लीमध्ये आधुनिक व दर्जेदार शाळांची निर्मिती झालेली आहे, त्याचप्रमाणे भद्रावती मधे सुद्धा आधुनिक व दर्जेदार शाळेची निर्मिती झाली पाहिजेत. प्रत्येक प्रभाग मधे दर्जेदार प्रथमीक शाळेची उभारणी झाली पाहिजे व भद्रावती शहरात किमान 2 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उभारणी झाली पाहिजे व इथल्या गोरगरीब जनतेच्या मुलांना व मुलींना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळाला पाहिजेत. जर असे होत नसेल तर जनतेकडून शिक्षण कर घेणे बंद करावे अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आले. यावेळी निवेदन देताना आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793