======================
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन
=========≈============
चंद्रपूर येथील आदिवासी मुलांचे वस्तीगृह भाड्याच्या खोलीत चालविल्या जात आहे. त्यामुळे दरमाह लाखो रुपये भाडेस्वरुपात द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता आता चंद्रपूर येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहासाठी शासकीय इमारत उभारण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावीत यांना करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावीत यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शुभम मडावी, नरेश आश्राम, सोमेश राजगडकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मागील ३०ते ४० वर्षापासून आदिवासी विद्यार्थांचे मुलांचे वसतीगृहे भाड्याच्या इमारतीत आहे. परिणामी लाखों रुपयांचे भाडे दरमहा खाजगी इमारत मालकांना द्यावे लागत आहे. या प्रदीर्घ कालावधीचा संपूर्ण राज्यभरचा विचार केल्यास मोठा निधी भाडे स्वरुपात खाजगी भाडे मालकाला देण्यात आला आहे. एवढ्या रकमेत आदिवासी विद्यार्थांकरीता स्वताचे वसतीगृहे उभे राहु शकले असते. याचा गांभीर्याने विचार करत चंद्रपूरात आदिवासी मुलांच्या वसतीगृहासाठी उपयुक्त जागेची निवड करत, सर्व आनुषंगिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======≈================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793