========================
*मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांची निवेदनाद्वारे मागणी*
========================
राजूर:- सर्वत्र पाऊसाने कहर केला असून सततच्या पावसामुळे राजुरा ते सोंडो,देवाडा व बल्लारपुर बामनी बायपास मुख्य मार्ग पर्यंत ठिकठिकानी मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून वाहन चालवीने अवघड आहे शालेय वाहन, रुग्न वाहीका या सारखे अत्यंत महत्त्वाची वाहने इथून येजा करन्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे वेळप्रसंगी या रस्त्यांवरून येजा करीत असतांना कोणती जीवीतहानी हि नाकारता येत नाही पायदळ चालने सूद्धा अवघड झाले आहे सनासुधीचे दिवसात काहि विपरीत घडु नये समोर गणेशउत्सवासारखे मोठ मोठे सण आहेत या आनंदोत्सावावर खड्यामूळे विघ्न येऊ नये यासाठी आपण या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन संबधीत रस्ते पूर्ववत सुरळीत करावे अन्यथा मनसे शैलीने आक्रमक आंदोलन करणार आणि याला सर्वस्वी संबंधीत विभाग जबाबदार असेल या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब तथा उपजिल्हाअधिकारी साहेब चंद्रपूर,प्रकल्प संचालक साहेब राष्ट्रीय महामार्ग चंद्रपूर, तहसीलदार साहेब राजूरा, कार्यकारी अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर, आमदार साहेब राजूरा विधानसभा क्षेत्र राजूरा तथा कार्यकारी अभियंता साहेब सार्वजनिक उपविभाग राजूरा यांना मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार तथा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष श्री. कुलदीप चंदनखेडे यांच्या प्रमूख उपस्थीतीत देन्यात आले सदर निवेदनाच्या मागनीची तात्काळ दखल घेत जिल्हाअधिकारी साहेब यांनी संबधीत विभागाला भ्रमणध्वणी वरून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करन्याचे सूचना राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जिचकार साहेब यांना दिल्या त्यांनी तात्काळ दखल घेत समंधित कंत्राटदार यांना सूचना दिल्या असून यांनी संबंधीत कंत्राटदाराला उद्या पासून काम सुरू करन्याचे सांगीतले सनासूदीच्या दिवसात कोणतीही अघटीत घटना घडू नये नागरीकांना प्रवास करतांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जनसेवेत तत्पर असते या मूख्यमार्गावरील रस्त्याचे नूतनीकरन झाल्यास अपघात व कोणतीही अघटीत घटना घडणे यावर प्रतीबंध नक्कीच येणार… निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष श्री. कुलदिप चंदणखेडे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष प्रविण शेवते, मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, सोनू परचाके, साहील कन्नाके, मनविसे पोंभूर्णा तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनविसे पोंभूर्णा तालुका सचिव महेश राजू नैताम, शंकर भडके,नितीन धूर्वे, नखुल धुर्वे, सोनु परचाके, आदर्श रासुरी, महेश विधाते, मनीष गोडसाले, भोला परचाके, अमन अंदुला,तथा मनसैनिक उपस्थीत होते,
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793