*प्रत्येक धर्मातील भजन मानवतेचाच संदेश देतात भागवताचार्य मनीषजी महाराज यांचे प्रतिपादन*

0
54

=====================

लोकसेवक डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंतीनिमित्त भजन संमेलन
136 भजन मंडळाचा सहभाग

जगातील प्रत्येक धर्म मानवतेचा गुरुमंत्र देणारा आहे.ज्याला आपला धर्म कळतो तो दुसऱ्या धर्माचा आदर करतो.राष्ट्रसंतांनी देखील भजनातून असाच संदेश दिला.त्यांच्या भजनातून देशात क्रांती झाली.आजही देशाला भजनाची गरज आहे.सर्वांचे जीवन धावपळीचे झाले आहे.अशात मन शांत करण्यासाठी व जीवनाचा आनंद लुटण्यासाठी भजन ऐकले पाहिजे,गायिले पाहिजे त्यात तल्लीन झाले पाहिजे असे मौलिक प्रबोधन भागवताचार्य मनीषजी महाराज यांनी भजन संमेलनात केले. ते अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम संचलित श्री गुरुदेव सेवा मंडळ शहर शाखा चंद्रपूर चे वतीने,लोकसेवक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे जयंती निमीत्य आयोजित भव्य भजन संमेलन कार्यक्रमात सोमवार 9 ऑक्टोबर ला महेश भवन तुकुम येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

======================
यावेळी उदघाटक म्हणून आ.किशोरजी जोरगेवार यांची तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजयराव आईंचवार(माजी कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ) श्री वसंतराव थोटे (अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती), दामोधर पाटील दादा(उपसर्वाधिकारी गु. आश्रम, मोझरी) ,श्रीप्रकाश महाराज वाघ. श्री विठ्ठलराव सावरकर,डॉ.दत्ता हजारे जिल्हा सेवाधिकारी ,श्री अशोकराव चरडे जिल्हा सेवाधिकारी, रुपलाल कावळे प्रसिद्धी प्रमुख, श्री राम राऊत, डॉक्टर अंकुश आगलावे, श्री प्रेमलाल पारधी,  मिलिंद कोतपल्लीवार, अडवोकेट किरण पाल,  ,श्री सुधाकर टिकले,श्री वासुदेवराव सादमवार ,श्री बबनराव धर्मपुरीवार , श्री प्रकाशराव गुंडावार, श्रीजयंतराव बोनगरवार ,श्रीसुमेध कोतपल्लिवार ,श्रीविलास येगिणवार ,श्रीअमित कासनगोटूटवार, डॉक्टर दाभेरे , यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना आ.किशोर जोरगेवार म्हणाले,डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी केलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. डॉक्टरी पेशात असणाऱ्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी ख-या अर्थाने रुग्णसेवा केली.म्हणूनच आज लोकसेवक असे संबोधण्यात येत आहे आज त्यांच्या जयंती निमित्त आपण आयोजित केलेले भजन संमेलन त्यांना आपण वाहिलेली सर्वोत्तम आदरांजली आहेच सोबतच संस्कृतीचा समृद्ध मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याचा संकल्प त्यांच्या जयंती दिनी आज आपण करुया, असे ते म्हणाले. गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजयराव आईंचवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले व संमेलनाचे कौतुक केले .
=========================
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना भजन संमेलनाचे मुख्यसंयोजक इंजि सुभाष कासनगोट्टूवार म्हणाले,प्रभागात सहा गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना , निर्माण नगर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रवेशद्वार बांधकाम नगरसेवक निधी मधून केले, महानगरपालिकेतर्फे महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या आलेल्या स्वच्छता स्पर्धेमध्ये गुरुदेव सेवा मंडळ तुकूमने तृतीय क्रमांक पटकाविला यात ५१ हजार रुपये रोख आणि दहा लाख रुपये विकास कार्य पुरस्कार मिळाला, तसेच तसेच ओपन स्पेस सौंदर्यकरनामध्ये माझ्या प्रभागातील १२ मंडळांनी सहभाग घेतला व पाच मंडळांना पुरस्कार मिळाला यात गुरुदेव सेवा मंडळ द्वारका  नगरीला ७१ हजार रुपये रोख आणि ७ लाख रुपये विकास कार्याचा पुरस्कार मिळाला , २६जानेवारी २०२३ ला राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा घेण्यात आली, सहा जून  लोकसेवक डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार यांचा स्मरण दिवस गुरुदेव सेवा मंडळ तूकुंम तर्फे १२००नागरिकांना चष्मे वाटप व १०६नागरिकांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात आले , आणि आज लोकसेवक डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंती निमित्त १३६ भजन मंडळ उपस्थित झाले आणि इतिहास झाला आणि भजन संमेलन सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत चालले.हे सर्व लोकनेते ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले,अशी माहिती त्यांनी दिली.
==========================
 *यावेळी कासनगोट्टूवार यांनी ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभ -संदेशपत्राचे वाचन केले. या भजन मंडळातील प्रथम पाच मंडळांना  क्लब राऊंड येथे होणाऱ्या मोठ्या  सांस्कृतिक कार्यक्रमात  लोकनेते विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे उपस्थिती मध्ये सिने कलावंतांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार असल्याची विशेष माहिती दादाजी नंदनवार यांनी दिली.कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम राऊत यांनी केले.अण्णाजी धवस यांनी आभार मानले.आयोजन समितीचे  ग्रामगीताचाऱ्य दादाजी नंदनवार, तालुका प्रमुख धनराज चौधरी, ग्रामगीताचार्य अण्णाजी ढवस,वसंतराव धंदरे, जेष्ठ उपासक पुरुषोत्तम राऊत,विठ्ठलराव डुकरे,गजानन भोयर,बबनराव अनमुलवार, आनंदराव मांदाडे, वृषाली धर्मपूरीवार, मंजुश्री कासंगोट्टूवार,प्रज्ञाताई गंधेवार,कल्पना गिरडकर,आशीष ताजने ,रामराव धारणे,बंडू वाढई ,मयाताई मंदाडे, भोलारम सोनुले ,आशिष बोंडे,सचिन हरणे,उषाताई मेश्राम ,यांनी परिश्रम घेतले.
..आणि ते म्हणाले गुरुदेव भक्त असा असावा.
======≈=====================
राष्ट्रसंतांनी मानवतेचा संदेश देत समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जीवन अर्पित केले.परिसरच नाही तर मनाची स्वच्छता त्यांनी केली आणि देशात क्रांती झाली.आज त्यांचे लाखो अनुयायी आहेत.पण त्या अनुयायीन्ना भजन संमेलन माध्यमातून एका मंचावर आणण्याची कला सर्वात नाही.हे शुभकार्य  गुरुदेव भक्त इंजि.सुभाष कासंगोट्टूवार यांनी केलं आहे.त्यांच्या कार्याचा आलेख बघितला तर गुरुदेव भक्त असा असावा म्हंटले तर वावगे ठरू नये,अश्या शब्दात कासंगोट्टूवार यांचे कौतुक गुरुकुंज आश्रम मोझरीचे उप सर्वाधिकारी दामोदर पाटील दादा यांनी केले.गुरुदेव भक्तांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.
===================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==≈==================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here