स्‍व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्‍या जयंतीनिमित्त हृदयविकार तपासणी शिबिर

0
45

================

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचा स्‍तुत्‍य उपक्रम

=======================

चंद्रपूर, दि.२५ : स्‍व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्‍या जयंती निमित्त श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर व फोर्टीज हॉस्‍पीटल मुलूंड, मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी मोफत हृदयविकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

=======================

दि. २९ ऑक्‍टोंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रभा सभागृह, वनअकादमी, मूल रोड, चंद्रपूर येथे या शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍व.डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी आपल्‍या वैद्यकिय शिक्षणाचा उपयोग सामाजिक सेवेसाठी केला होता. त्‍यामुळे त्‍यांच्‍या स्‍मरणार्थ निःशुल्क हृदयविकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. राज्‍याचे वन, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते या ‍शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या शिबिरामध्‍ये ज्‍या बालरुग्‍णांना तपासणीनंतर हृदयविकारासंबंधी समस्‍या आढळतील, अशा बालकांचे निःशुल्‍क उपचार फोर्टीज रुग्‍णालय मुलूंड, मुंबई येथे करण्‍यात येणार आहेत.

=====================

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेद्वारा कायमचं सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. कोविड-१९ ने थैमान मांडले असताना सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत कोविड रुग्‍ण व कोविडमुळे प्रभावित झालेल्‍या नागरिकांना पीपीई किट, मास्‍क, अन्‍नधान्य किट, रक्‍त पुरवठा, सॅनिटायजर, रुग्‍णवाहिका, ऑक्‍सीजन इत्यादी सर्व प्रकारची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्‍ये वेळोवेळी नेत्र चिकित्‍सा शिबिराचे आयोजन करुन १ लाखावर नागरिकांना या शिबिराचा लाभ चंद्रपूर येथील श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेद्वारा देण्यात आला. आतापर्यंत ५० हजार चष्‍मे वाटप झाले असून १२ हजार रुग्‍णांचे डोळ्यांचे ऑपरेशन संस्‍थेअंतर्गत सेवाग्राम येथे करण्‍यात आले. कॅन्‍सर पेशंट ऐड असोसिशन, मुंबई यांच्‍या मदतीने वेळोवेळी कॅन्‍सर तपासणी शिबिराचे आयोजनही करण्‍यात आले.

=====================

 याआधी १८ जून २०२२ रोजी फोर्टीज हॉस्‍पीटल मुलूंड, मुंबई यांच्‍या सहकार्याने हृदयरोग तपासणी शिबिर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अंदाजे एक कोटी रुपयांचा निधी खर्च करीत ३० बालकांवर हृदयविकारासंबंधी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. यावेळी आयोजित करण्‍यात आलेल्‍या हृदयविकार शिबिराचा सर्वांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन श्री माता  कन्‍यका सेवा संस्‍थेचे सचिव राजेश्‍वर सुरावार यांनी केले आहे.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here