=========================
चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर भूमिपुत्र युवा संघटनेने आक्षेप घेतला आहे. या प्रस्तावात चंद्रपूर शहराभोवतीच्या 13 किलोमीटर अंतरातील सर्व गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही या प्रस्तावावर आक्षेप घेतो, असे संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
============≈=======
चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना 2011 मध्ये झाली. त्यावेळी पूर्वीच्या नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या आणि वस्ती समाविष्ट करण्यात आली होती. आता स्थापनेच्या 12 वर्षांनी महापालिकेची हद्द वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात मोरवा, ताडाली, साखरवाही, येरुर, पडोली, आदी गावांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र, मनपा क्षेत्रातील आजूबाजूच्या 13 किलोमीटर अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा आणि मोठ्या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रस्तावावर आक्षेप घेण्यात येत आहे.
======================
पूर्वीपासून समाविष्ट असलेल्या प्रभागाचा सर्व परीने विकास करावा. आताच मनपा क्षेत्रात पाण्याची समस्या जटील आहे. रस्ते बरोबर नाही. मग हद्द वाढवून काय होईल. सध्या पूर्वीपासून समाविष्ट भागातच विकास होऊ द्या. नागरिकांना सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळू द्या, असे चोखारे यांनी म्हटले आहे.
====================
चंद्रपूर शहराचा विकास हा सर्वांगीण असावा, यासाठी मनपा क्षेत्रातील आजूबाजूच्या 13 किलोमीटर अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा समावेश करण्यात यावा. यामुळे शहराचा विकास होईल आणि शहरातील रहिवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतील. जवळच्या इतर गावांचा समावेश न करता मोरवा, ताडाली, साखरवाही, येरुर, पडोली, आदी गावांचा समावेश करून ही हद्द वाढ करणे म्हणजे जाणीवपूर्वक दुजाभाव करण्यासारखे आहे. त्यामुळे मनपापासून जवळपास असलेली सर्व गावे यात समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा समावेश करू नये, अशी विनंती चोखारे यांनी केली आहे.
=========≈================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793