============≠=====≠===
एक महिना चालणार उपक्रम, नोंदणीकृत नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
=================≠====
नागरिकांना उपचारासाठी पाच लाखांपर्यंत शासकिय मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येत आहे. यात जनगणना यादीत समाविष्ट असलेल्या जवळपास पाच हजार नागरिकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सदर योजनेचे कार्ड वितरीत करण्यात आले आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात सदर कार्ड वाटप सुरु असुन नोंदणीकृत नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
=======================
केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेमूळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येणार आहे. केंद्र सरकारने ही योजना 23 सप्टेंबर, 2018 रोजी सुरु केली होती. या योजनेत किरकोळ उपचारापासून ते शस्त्रक्रियेचा लाभ रुग्णांना घेता येता येणार आहे. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतो. सदर योजने अंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत रुग्णांचा खर्च सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे.
=====================
2011 च्या जनगणना यादीत समाविष्ट असलेल्या नागरिकांची सदर योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीकृत पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरीत करण्याचा उपक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात येत आहे. 5 ऑक्टोबर पासून जैन भवण जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात सदर उपक्रम राबविल्या जात असून मागील एक महिण्यात पाच हजाराहून अधिक नागरिकांना कार्ड वितरित करण्यात आले आहे. सदर उपक्रम पूढील एक महिणा चालणार असून नोंदणीकृत नागरिकांनी कार्यालयात सुरु असलेल्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================≠=
संपादक :- शशी ठक्कर 9881277793