*देवळा चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी*

0
40

=======≠============

*मनसे शेतकरी सेनेच्या वतीने*

====================

यंदाच्या खरीप हंगामामध्ये वरून राजाने दांडी मारल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह उर्वरित महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जवळपास राज्यातील ४०-५० तालुके शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले असतानाही नाशिक जिल्ह्यातील देवळा चांदवड तालुक्यामध्ये पाऊस न पडल्याने कुठलेही खरीप पिक न आल्याने जनावरांच्या चाऱ्यांबरोबरच मानवी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने अतिशय भयवाह परिस्थिती लक्षात घेता दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करून शासन स्तरावरून मदत जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने देवळा तालुका अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण आणि मनसे तालुकाध्यक्ष विश्वास पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे

===================≠≠====

संपूर्ण देवळा व चांदवड तालुक्यामध्ये खरीप हंगामात पाऊस न पडल्यामुळे कुठल्याही प्रकारचे खरीप पिके येऊ न शकल्याने जनावरांच्या चाऱ्या बरोबरच वाडी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची देखील भयानक परिस्थिती नोव्हेंबर महिन्यामध्येच गंभीर स्वरूपाची दिसू लागल्याने राज्य शासनाने सर्वप्रथम देवळा आणि चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चारा छावण्या उभारण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न केला तरच शेतकऱ्यांचे जनावरे जगू शकतील अन्यथा जनावरे जगणे आणि जगवणे अवघड होईल या सर्व परिस्थितीचा विचार करता शासनाने दुष्काळी परिस्थितीचं गंभीर स्वरूप लक्षात घेता हेक्टरी पन्नास हजार मदत जाहीर करून सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवळा येथील तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे
वास्तविक पाहता राज्य शासनाने इतर तालुके दुष्काळी जाहीर करून देवळा आणि चांदवड तालुक्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती असताना देखील केवळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित कारभारामुळे चांदवड आणि देवळा तालुक्यावर अन्याय करत दुष्काळी तालुके म्हणून वंचित ठेवण्याचे पाप राज्य शासन करत असल्याने एक प्रकारे उन्हाळी कांद्यामध्ये शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत 40% निर्यात शुल्क लावून थोड्याफार प्रमाणात त शेतकऱ्यांचं कांदा उत्पादनातून भलं करता आलं असतं ते देखील भलं न करता शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान करण्याचं महापाप तिघाडी सरकारने करत शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचं कामच केलेलं आहे खरीप हंगामात पाऊस न पडल्याने कुठलेही पीक येऊ शकले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित ढासळलं पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना पाण्याबरोबर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे ही सर्व भयानक परिस्थिती समोर असतानाही देवळा चांदवड तालुका दुष्काळाचे भयानक चटके सोसत असताना देखील इतर तालुके दुष्काळी जाहीर करत केवळ लोकप्रतिनिधींच्या आणि राज्य शासनाच्या बेफिकीरपणामुळे देवळा आणि चांदवड तालुक्यावर दुष्काळ जाहीर न करता एक प्रकारे अन्याय केला जात असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे
मनसेच्या वतीने देवळा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात चांदवड देवळा तालुका सरसकट दुष्काळी जाहीर करत हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी आणि या वर्षाची विद्युत वापर नसल्याने सरसकट दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांचे विद्युत पंपासाठी येणारे विद्युत बिल माफ करण्यात यावे शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्ज माफ करण्यात यावे तसेच वर्षानुवर्ष जर शेतकरी कर्जफेड करत असेल तर अशा प्रामाणिक नियमित कर्जफेड करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांसाठी कुठल्याही अटी शर्ती न ठेवता पन्नास हजार रुपयेंचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे , कांद्याचे थकीत अनुदान कुठलेही शासकीय नियम कठोर न करता तात्काळ जमा करण्यात यावे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता शालेय फी संपूर्णपणे माफ करण्यात यावी आधी महत्वपूर्ण मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने तहसीलदार देवळा यांना निवेदनाद्वारे शासनाला करण्यात आले आहे.
मनसे नवनिर्माण सेनेच्या व शेतकरी सेनेच्या वतीने देवळा चांदवड तालुका सरसकट दुष्काळी जाहीर करण्याच्या आणि भयानक दुष्काळी परिस्थितीच्या भविष्यकालीन बाबींचा विचार करता करण्यात आलेल्या मागणींचा शासनाने गंभीरतेने दखल न घेतल्यास मनसे स्टाईल दोन्ही तालुक्यांमध्ये जोरदारपणे रस्त्यावर संघर्ष उभा करत आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवळा तालुका अध्यक्ष श्री विश्वासराव पवार आणि शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यापूर्वी देखील 23 ऑगस्ट रोजी याच प्रश्नावर पक्षाच्या वतीने देवळा चांदवड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असे मागणी करण्यात आलेली होती परंतु राज्य शासनाने दुष्काळी तालुक्यांची यादीतून देवळा आणि चांदवड तालुका वगळून एक प्रकारे शेतकऱ्यांची कोचेष्टाच करण्याचा प्रकार राज्य शासनाने केला असल्याने मनसेच्या वतीने जशास तसे उत्तर रस्त्यावर येऊन देण्यात येईल असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे तालुका अध्यक्ष विश्वास पवार मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण यासह सचिन शेवाळे, प्रवीण निकम आप्पा कुलकर्णी रोशन शेवाळे अमित चव्हाण सतीश शिरसाट सतीश शेवाळे सचिन गांगुर्डे दिगंबर अहिरे आधी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आलेले आहे.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here