========================
ताडाळी, 9 नोव्हेंबर 2023: ताडाळी एम.आय.डी.सी.स्पंज आर्यण कामगार संघटनेच्या वतीने गोपाणी आर्यण पावर कंपनीचे कामगार क्रिण्षा महादु वंजारी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.
==========≠====≠≠=======
क्रिण्षा वंजारी यांचे दि.16/8/2023 रोजी अकस्मात निधन झाले होते. त्यांचे वय 45 वर्षे होते. ते कंपनीत 20 वर्षांपासून काम करत होते. ते एक निष्ठावान आणि परिश्रमी कामगार होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
============≠=============
या पार्श्वभूमीवर ताडाळी एम.आय.डी.सी.स्पंज आर्यण कामगार संघटनेने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून 82600 रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्निला दिला.
==============≠=========
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे, महासचिव संतोष बांदुरकर, कार्याध्यक्ष तुळशिराम डेरकर, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, सदाशिव चतुर, सागर कन्नीरवार, दशरथ रोगे, विकास आवारी, संतोष खोब्रागडे, नंदु टोंगे, महेश जुनघरे, विजय मोरे, रमेश आरपेल्ली उपस्थित होते.
=======================
या आर्थिक मदतीमुळे क्रिण्षा वंजारी यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
========≠================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====≠===================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793
—