============≠=======
अभ्यासिकेच्या इमारतीचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण
======================
मतदारसंघात गरिब गरजु विद्यार्थ्यांसाठी 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता, आज यातील एका अभ्यासिकेच्या इमारतीचे लोकार्पण करतांना आनंद होत आहे. येथे अभ्यासिकेचे साहित्य खरेदीसाठी लवकरच आपण निधी उपलब्ध करुन देणार आहोत. आजचा हा लोकार्पण कार्यक्रम आमच्या संकल्पपुर्तीकडील पाऊल असून लोकार्पित झालेली ही वास्तु विद्यार्थ्यांसह समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
=========================
आमदार निधीतून 25 लक्ष रुपये खर्च करत तुकुम येथील पसायदान ज्येष्ठ नागरिक संघ येथे तयार करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या इमारतीचे आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पसायदान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाशराव गुंडावार, उपाध्यक्ष कुसन नागोसे, सचिव दादाजी नंदनवार, सहसचिव देवराव कोटकर, माजी नगरसेवक संदिप आवारी, दिपक तमिवार, अॅड. एम एम सातपुते, अॅड. शेख सत्तार, नथ्थु मत्ते, हिरामण भोवते, रमेश लखमापूरे, श्रावण नन्नावरे, पसायदान योग नृत्य परिवारच्या वनश्री मेश्राम आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक संघात येऊन जेष्टांचा आर्शिवाद घेण्याचे वारंवार सौभाग्य मला मिळत आहे. येथे आल्यावर नवी उर्जा मिळते, जेष्टांच्या अनुभवातून आलेले समजा उपायोगी विचारांचा संचार येथून होतो. आपले विचार समाजासाठी उपयोगाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहिले आहे. त्यात यशही आले याचे समाधान आहे. आज येथे योगासाठी शेड तयार करण्याची मागणी आली. त्यासाठीही आपण निधी देणार असल्याची घोषणा यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
चंद्रपूरातील युवकांमध्ये प्रतिभा आहे. येथील काही युवकांनी मिळून हायड्रोजन कारची निर्मिती केली. अशा युवकांना आपण प्रोत्साहित केले पाहिजे. अनेक गरिब कुटूंबातील युवकांमध्ये विविध प्रकारच्या प्रतिभा दडल्या आहेत. त्या आपण शोधून त्यांना संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. कोरोणाच्या काळात खाजगी अभ्यासिकांची फी परवडत नाही हे सांगण्यासाठी काही युवक आमच्याकडे आले होते. त्या दिवशी अशा युवकांसाठी मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प आपण केला होता. यातील 8 अभ्यासिकांचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. तर तिन अभ्यासिकांच्या इमारतीचे काम जवळपास पुर्ण झाले असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
आज लोकार्पित झालेल्या अभ्यासिकेच्या इमारतीसाठी माझे विशेष प्रयत्न सुरु होते. पसायदान ज्येष्ट नागरिक संघानेही यात मोठे सहकार्य केले आणि या एकत्रित प्रयत्नांमुळे आज येथे ही इमारत उभी राहु शकली. आता या इमारतीत अभ्यासिकेच्या साहित्यांची गरज आहे. ती पुर्ण करण्यासाठीही आपण 10 लाख रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी बोलतांना केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
====≠=================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793