========================
*आपल्या हक्काच्या सरकारी शाळा आणि शिक्षण वाचविण्यासाठी आपण सर्वांनी या शिक्षण बचाव मोहिमेत सामील होऊया*
=======================
*गाडगेबाबांचा संदेश…*
=====================
मायबाप लोकं हो, *एक वेळा उपाशी राहा, पण लेकराईले शाळेत घाला बाप्पा.’* अशा शब्दात गाडगे महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व लोकाईले सांगतलं. लोकाने गाडगे महाराजांच आयकुन लेकराईले शाळेत घातलं. कशातरी एक दोन पिढ्या शिकल्या. प्राथमिक शिक्षण गावातच शिकल्या. गावात शाळा होती म्हणूनस्यानी गावातले लेकरं प्राथमिक शिक्षण शिकू शकले. पण आता सरकार गावातली शाळा बंद करणार आहे म्हणे. तसा आदेशच काढला आहे सरकारनं. मागच्या वर्सी सप्टेंबर मयन्याच्या २१ तारकेले सरकारने फरमाण काढला होता. २० किंवा त्याच्यापेक्षा कमी लेकरं असलेल्या शाळा बंद करण्याची कारवाई कुठपर्यंत आली अशी विचारणा करणारे पत्र सरकारने अधिकाऱ्याला धाडलं आहे. आता पुन्हा या वर्सी पुन्हा सरकारने सप्टेंबर मयन्यात फरमाण काढला आहे. गावच्या लहान लहान शाळा बंद करूनस्यानी मोठ्या शाळेमधी लेकराईले जायले सांगणार आहे. मोठ्या शाळेले शाळा संकुल म्हणत्यात. गावची शाळा (आमच्या लेकराईची शाळा) भांडवलदाराईले दत्तक देणार आहे. *जिल्हा परिषदच्या सगळ्याच्या सगळ्या ६५ हजार शाळा दत्तक देणार आहे.* ६५ हजार शाळेच्या जमिनी भांडवलदाराईच्या कब्जात जातीन. जमिनीचा हिसाब करता- करता मले तर चक्करच आला. या उरफाट्या सरकारने आपले लेकरं शिकवाच जीवावर येऊन रायलं. ईचार करण्याची गोष्ट आहे, गावची शाळा बंद झाली अन दत्तक देली तर आमचे गावचे लहान लहान लेकरं दूरदूर शाळेत कसे जातीन? आमच्या ईचाराने गावची शाळा बंद झाली नाही पायजे. गावची शाळा गावातच रायली पायजे. तिला दुरुस्त केली पायजे. कायद्यापरमाणे सगळ्या शाळेमधी सगळ्या सोयी सुविधा केल्या पायजे. गुरुजीले आलतू-फालतू (अशैक्षणिक काम) देल्लं नाही पायजे. त्याईले वर्गात सिकवू देल्लं पायजे. इंग्रजी शिकवाले अल्लग मास्तर ठेवला पायजे. गावची शाळा दत्तक नाही देल्ली पायजे. सरकारने शाळा चालवले पैसे देल्ले पायजे. हे सगळं करासाठी आपल्याला एकत्र या लागन. *ईचार करा लागन. सरकारले ठणकून सांगा लागन.* सरकारले वठणीवर आणण्यासाठी बायको, लेकरं, सगे-सोयरे, शेजार-पाजार संग चंद्रपूरले परिषदेत या लागन. तवाचं गाडगेबाबाच लेकरायले शिकवायचं सपन पूर्ण होईन बाप्पा.
=========================
शिक्षण बचाव समन्वय समिति,
जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय
*शिक्षण बचाव परिषद*
रविवार, दि.१७ डिसेंबर २०२३,
स.१० ते सायं. ५ वा.
स्थळ: प्रियदर्शनी
सभागृह, चंद्रपूर
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069