===========================
*पुणे, दि.२० डिसेंबर २०२३*
===========================
एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी *पुणे पुस्तक महोत्सवासारखे* उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
=========================
नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित *पुणे पुस्तक महोत्सवाला* सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी रात्री भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेश पांडे, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री प्रसेनजीत फडणवीस, भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री. धीरज घाटे, राज्य मराठी विकास संस्थेचे माजी प्रभारी संचालक प्रा. आनंद काटीकर आदी उपस्थित होते.
=========================
श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून या भव्य आयोजनाबद्दल श्री राजेश पांडे यांचे कौतुक केले. त्यांनी श्री.पांडे यांच्याकडून महोत्सवात झालेल्या गिनीज विश्वविक्रमाचीही माहिती घेतली.
==========================
विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तके मार्गदर्शक ठरतात आणि मुलांना पुस्तकापर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे आयोजन महत्वाचे आहे, असे नमूद करून त्यांनी संयोजनात सहभागी व्यक्ती आणि संस्थांचे अभिनंदन केले.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069