========================
*सुरज शहा यांनी केली मंदिर संस्था चालकांवर कार्यवाही करण्याची मागणी*
==========================
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ इथे शिवमंदिर देवस्थान आहे. त्या मंदिराची स्थापना 2006 रोजी झाली आहे व वर्ष 2008 रोजी मंदिराची रजिस्ट्रेशन (रजी. न. A/817/2008) झालेली आहे. घोडपेठ च्या गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरज शहा यांना शिवमंदिर देवस्थान बाबत तक्रार दिली. तक्रार अशी की मंदिरात बोगस विवाह सोहळा होते आणि बेकायदेशीर रक्कम गोळा करतात व लग्नाचे प्रमाणपत्र वाटल्या जाते. याबाबत जेव्हा सामाजिक कार्यकर्ते सुरज शहा यांनी सखोल चौकशी केली असता त्यावेळी आढळले की संस्थेचे रजिस्ट्रेशन वर्ष 2008 साली झाले. त्यानंतर पासून कधी संस्थेने ऑडिट नाही केलं व कधी संस्थेची निवडणूक सुद्धा नाही घेण्यात आली. श्री शिव मंदिर देवस्थान घोडपेठ संस्थेच्या घटनेनुसार विवाह सोहळा करता येत नाही किंवा कोणाकडून विवाह करिता देणगी घेण्यात येत नाही व लग्न प्रमाणपत्र देता येत नाही. गेल्या 15 वर्षापासून संस्था चालक मंदिरात हा बोगस प्रकार करत आहे व अंदाजीत रक्कम तीन कोटी रुपयांची उलाढाल केलेली आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरज शहा यांनी केला आहे. याबाबत चौकशी करण्याकरिता धर्मदाय आयुक्त चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधीक्षक वरोरा, व ठाणेदार साहेब भद्रावती यांना निवेदन देण्यात आले आहे.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069