*खरच जनतेला नगरसेवकांची आवश्यकता आहे का?*

0
47

=========≠============= 

✍️… nilesh ठाकरे 9371321070 

========≠===============
सध्या चंद्रपुर मनपाच्या निवडणुक हाेत नसल्याने जवळपास गेल्या दाेन वर्षापासुन मनपा येथे प्रशासकराज कारभार सुरू आहे. म्हनुन प्रभागातले नगरसेवक सध्या प्रभागात फिरतांना दिसुन येत नाही. संविधानाचे उलंघन करित निवडणुक आयाेग महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका का बर घेत नाही असा प्रश्न जनसामान्याला नक्कीत पडत असेल. जर निवडणुका घ्यायच्याच नसतील तर निवडणुक आयाेगाने नेहमी करिता महापालिकेच्या निवडणुकाच रद्द करायला हवे. त्यामुळे नगरसेवकांचे मानधन व वाहन खर्चापोटी होत असलेला लाखाे,कोटी रुपयांचा शासन खर्च तरी वाचेल. दाेन वर्षा पासुन नगरसेवक नसतांना खरे तर महापालिकेत नगरसेवकांची खरोखरच आवश्यकता तरी आहे का? असा प्रश्न मतदारांना सुध्दा पडलेला असेल. प्रभागात तर साेडाच, महापालिकेत ही नगर सेवक कुठेच दिसुन येत नाहीत. चंद्रपुर महानगरात प्रत्येक प्रभागात अमृत याेजनेच्या नावाखाली गरीब जनतेच्या म्हनजे मनपाला कर देणारे करदात्यांच्या पैश्यातुन सुरवळीत शहरात झालेले सिमेंट कॉंक्ट्रेटींगचे रस्ते सुध्दा या याेजने करिता गड्डेमय करण्यात आले. परंतु त्या रसत्याची साधी डागडुगी करण्यास नगरसेवक कंत्राटधारकांनवर आक्रमक भुमिका घेत नाहीत? एकीकडे शहरात वाहतुकीची काेंडी हाेत असते व चंद्रपुरात अतिक्रमाणात दिवसेन वाढ हाेत असतांना अवैध अतिक्रमाण थांबवण्यासाठी नगरसेवक पुढे येत नाहीत. तसेच प्रभागातुन कार्यालईन कामाकरिता महानगरपालिकेत येणार्या नागरीकांना सुविधा व्हावी म्हनुन ही आजच्या घडीला नगर सेवक मनपा कार्यालयात उपलब्ध नसतात. महानगरात आराेग्य, शिक्षण, स्वच्छता पुर्ण पणे काेलमाेडली असतांना मात्र माजी. नगरसेवक मृग गिळुन गप्प बसले आहेत. असे असतांना मग नगरसेवकांची लाेकसेवे करिता गरज तरी काय ?मनपा सत्ताधारी नगर सेवक आपल्या मंत्री महाेदयांनी निरंतर आयाेजित केलेले ईव्हेंट, कार्यक्रम, साेहळे या करिता प्रभागातुन गर्दी जमवण्यातच आपले कार्य समजुन “ऑल ईज वेल” म्हनत स्वताच्या मनाची समजुत घालत आपलीच पाठ थाेपत स्वतालाच धन्य समजुन आपनच भविष्यातले निवडुण येणारे आमदार, खासदार आहाेत असे म्हनत असतिल तर मग नगरसेवकांची गरज काय? विराेधी पक्षात बसणारे नगरसेवक सुध्दा जनसामान्य मतदारांचे प्रश्न उचलत धरत नसतील व या विषयाकडे दुर्लक्ष करित असतिल तर मग जनतेला नगर सेवकांची गरजच काय? निवडणुका केव्हा हाेतील याची वाट बघत निवडणुक आल्यावरच जनतेपुढे जाऊ म्हनजे “आयत्या बिळात नागाेबा” पुरतेच कार्य करण्याचे मन बाळगुन असतिल तर मग नगरसेवकांची खरच गरज आहे काय? असा प्रश्न जनतेच्या डाेळ्यापुढे उदभवताे. नगरसेवकांमुळे खरंच शहराचा विकास होतो का? सर्वसामान्य नागरिकांची कामे ते करतात का? दरवर्षी नागरिकांच्या माथी करवाढीचा बोजा टाकून कधी ही करवाढीस नगरसेवकांनी विराेध केला काय? नाही ना मग नगरसेवकांची गरज काय? आता तर घरपट्टीत देखिल मागील वर्षी मनपा प्रशासनाच्या वतीने भरसाठ वाढ करण्यात आली. ज्यादा वाढीव घरकर नागरीकांकडुन मनपाकडुन आकारला जात असतांना नगरसेवक जनतेकरिता रसत्यावर येत नसतील तर मग नगरसेवकांची गरज काय? मग आतापर्यंत नगरसेवकांनी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, कचरा समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मैदाने, क्रीडांगणे, आरोग्यविषयक सुधारणा, ड्रेनेज, पदपथ, सार्वजनिक दवाखाने, बागा यांमध्ये किती सुधारणा केल्या व त्यामुळे मतदारांना, करदात्यांना किती फायदा झाला? याचे सहानिशा करणे गरजेचे आहे. करदात्यांनकरिता आणि मतदारांसाठी काहीच न करता पाच वर्षांनी नगरसेवकांच्या संपत्तीत वाढ झालेली पाहायला मिळते ती वाढ कशी हाेत असते हा मात्र संशोधनाचा विषय आहे. करदात्या नागरिकांकडून दरवर्षी हजारो लाखाे कोटी रुपये कर वसूल केला जातो. मग विकास कामे का होत नाहीत? यामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विचार केला तर महापालिकेत खरोखरच नगरसेवकांची आवश्यकता आहे का? याचा विचार करदात्यांनी व मतदारांनी करण्याची वेळ आता आली आहे, आणि तो केलाही पाहिजे. यामुळे निवडणुक आयाेगानी महापालिकेच्या या पुढे निवडणुकाच घेवु नये म्हनजे महापालिका निवडणुकीत दर पाच वर्षांनी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्चही वाचेल.’ *करदाता जागा हो,मतदार दाता जागा हाे* असेच आता म्हनावे लागेल.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here