*शिक्षण बचाव समन्वय समिति चंद्रपुर कडून 28 फेब्रूवारी ला महत्वपूर्ण मीटिंग चे आयोजन*

0
26

=≠======================

*चंद्रपूर*

===================
पुरोगामी संघटना, शिक्षक संघटना, दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या विमुक्त संघटना, मुस्लिम संघटना, महिला संघटनांच्या प्रतिनिधी मित्रांना कळकळीचे आवाहन करीत आहोत.
मित्रांनो,
आपल्या सगळ्यांना माहीत असेल महाराष्ट्र सरकारने २१ सप्टेंबर २०२२ ला पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर सातत्याने सरकारने शाळा बंदीचे पाऊल उचलले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये दोन आदेश काढुन शाळा संकुल निर्मिती व शाळा दत्तक देण्याचा निर्णय जाहीर केला.
*यामुळे ६५ हजार सरकारी शाळा भांडवलदारांच्या घशात घातल्या जातील. सरकारी शाळांचे संपूर्ण खाजगीकरण करण्याचा पाऊल सरकारने उचलले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा असेल तोच आपल्या लेकराला शिकवु शकेल.*
*शाळा संकुल योजनेतून गावागावांतील शाळा बंद करुन शाळा संकुल सुरू केल्या जाणार आहे. यामुळे १० किमी लांब अंतरावर मुलांना शाळेत जाणे कदापी शक्य होणार नाही. ग्रामीण भागातील दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, मुस्लिम व महिला शिक्षणातून कायमचे बाहेर फेकल्या जातील. ही अंत्यंत चिंतेची बाब आहे.*

याचा ताकदीने विरोध होणे काळाची गरज आहे.
*दिनांक*
बुधवार 28 फेब्र 2024
*वेळ*
सायंकाळी 6 वाजता
*स्थळ*
शासकीय विश्राम गृह ,नागपूर रोड चंद्रपूर ‌. इथे मिटींग आयोजित केली आहे. आपण अवश्य उपस्थित राहावे ही विनंती.
आपला विनीत.
*शिक्षण बचाव समन्वय समिती जिल्हा.चंद्रपूर*

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here