==========================
*ब्रह्मपुरी*
========================
जनतेला भुल थापा देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करून उद्योगपतींचे घर भरले आहे. तर सर्वत्र लूट माजविनाऱ्या भाजपने आता जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मांधता पसरविणे सुरु केले आहे. देशांत महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढली असताना दुसरीकडे लोकांच्या हातून रोजगार हिरावला जात आहे. अश्या निष्ठूर व मनुस्मृतीतून जनतेवर सुड उगारणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून हद्दपार करा व संविधान आणि लोकशाही वाचवा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र निवडणूक संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणुन बोलत होते.
आयोजीत कार्यक्रमास महाविकास आघाडी व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान काँग्रेस चे गडचिरोली माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, विनोद झगडे, काँग्रेस ता.अध्यक्ष खेमराज तीडके, कृउबा सभापति प्रभाकरजी सेलोकार,ॲड.गोविंद भेंडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, प्रा. राजेश कांबळे, नगर परिषदेचे माजी सभापती विलास विखार, माजी प.स.सदस्य थानेश्वर कायरकर, काँग्रेस शहरअध्यक्ष हितेंद्र राऊत, नेताजी मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मोंटू पिल्लारे, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे, उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, महीला आघाडी अध्यक्ष मंगला लोनबले, शिवसेनेच्या नर्मदा बोरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, सुनीता तिडके, वनिता ठाकूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सुचित्रा ठाकरे, प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशांत सत्ता धाऱ्यांकडून स्वाय्यात संस्थांचा मोठ्या प्रमाणात गैर वापार सुरु असुन यातुन पक्ष फोडा फोडीचे राजकरण सुरु आहे. देशातली महीला भगिनी सुरक्षित नाही. भ्रष्ट राजकारण्यांना क्लीन चिट देण्याचे कार्य सुरु आहे. पेट्रोल, डिझेल , गॅस, खते, दूध यावर प्रचंड प्रमाणात भाव वाढ व जी एस टी लावून जनतेची शेतकऱ्यांची लूट केल्या जात आहे. रुपया घसरला, अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले तरी मात्र देश भक्ती व धर्मांधतेचे सोंग करुन दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचे हि ते यावेळी म्हणाले.तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय असुन यातुन आपण आपले स्वतंत्र व संविधान टिकवू शकतो म्हणुन इंडिया आघाडीच एकमेव पर्याय आहे. यावेळी मार्गदर्शन पर बोलतांना गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, मी पक्ष संघटन, कार्यकर्ता भेटी व कामात सातत्य ठेवल्याने मला पक्षाकडून निवडणूक लढण्याची जबाबदारी मिळाली. तर उमेदवारी मिळण्यामागे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे ही त्यांनीं या प्रसंगी आवर्जून सांगीतले. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनी आपल्या विशेष शैलीतून भाजपाच्या अन्याय कारक तसेच हुकूमशाही धोरणाचा निषेध नोंदवून समाचार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल मैंद, प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके यांनी केले. यावेळी ब्रम्हपुरी तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तसेच महाविकास तथा इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, ग्राम कमिटी अध्यक्ष व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,