========================
रविवार दिनांक 7 एप्रिल 2024- आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तानाशाही पध्दतीने अटक करण्यात आली. अटकेत असतांना त्यांचे आरोग्य ढासळत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे व त्यांची लवकर सुटका व्हावी तसेच देशातील तानाशाही व्यवस्थेला सुबुद्धी लाभावी याकरिता शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकारणीने बस स्थानकासमोरिल इंडिया आघाडीच्या पेंडालमध्ये सामुहिक उपवास आयोजित केले. या कार्यक्रमात पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी रोजा ठेवला, तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक उपवास ठेऊन केजरीवाल यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यासह याठिकाणी भजन गाऊन प्रार्थना करण्यात आली. यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, शहर संघठन मंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, महिला अध्यक्ष किरण खन्ना, उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, युवा अध्यक्ष सागर कांबळे, गणेश अकोले, पप्पू श्रीवास्तव, बेबीताई बुरडकर, रेखा भोगे, मीनाक्षी अकोले व इत्यादी पदाधिकारी तसेच आप व इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,