========================
*ब्रम्हपुरी महिला काँग्रेसची पोलिस ठाण्यात धाव*
==========================
*ब्रम्हपुरी*
============================
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपाचे उमेदवार व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर यांनी 8 एप्रिल रोजी मोरवा येथे आयोजित प्रचारसभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाऊ-बहिणींच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारे वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेसच्या वतीने मुनगंटीवार यांचा निषेध व्यक्त करीत पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी या ओबीसीबहुल लोकसभा मतदारसंघात भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रचारास प्रारंभ केला आहे. दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर-वर्णी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजप व महायुतीचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांचे प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोरवा येथे सभा पार पडली. सदर सभेत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजप व महायुतीचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांनी उपस्थित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महिला भगिनी तसेच उपस्थित जनसमुदायासमोर बेबाक व बेताल वक्तव्य करीत “भावासोबत बहिणीला नग्न करून एका खाटेवर झोपवितात” असा बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासत काँग्रेस पक्षाला उद्देशून तसेच देशातील समस्त महिला भगिनींचा अपमान करून संपूर्ण देशवाशियांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत .
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व एक जबाबदार नागरिक असलेले सुधिर मुनगंटीवार यांचे प्रचार सभेतील वक्तव्य अतिशय खालच्या पातळीचे असून त्यांना अशोभनिय आहे. एकीकडे महिलांच्या सन्मानाचे सोंग करून दुसरीकडे मात्र स्त्री जातीला भर सभेत वाट्टेल ते बोलणे तसेच त्यांचे पक्षश्रेष्ठी उपस्थित असतांना यावर मुनगंटीवारांना समज देणे गरजेचे होते. मात्र असे काहीच घडले नाही. असे दर्शवून पक्षश्रेष्ठीनी देखील चुप्पी साधली. हा सर्व प्रकार म्हणजे भाजप नेते व उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांचे कडून महिला सन्मानाला ठेस पोहचविणारा आहे. त्यांच्या या वक्तव्याचा ब्रम्हपुरी काँग्रेसने निषेध व्यक्त करीत सुधिर मुनगंटीवार यांचेवर कठोर कारवाई करून गुन्हा नोंद करावा. याची मागणी केली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर सर्व महिलाच्या वतीने रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्यात येणार आहे व यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. असा निर्वाणीचा इशारा ब्रम्हपुरी महिला काँगेसच्या वतीने देण्यात आला आहे.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,