=====≠===================
वरोरा तालुक्यात प्रचार व जाहिर सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
===========================
चंद्रपूर / दि. १० एप्रिल २०२४ :- आज गुढीपाडवा सण आहे, गुढीपाडवा म्हणजे मांडवस. पूर्वीपासुन शेतकरी बांधव हा सण साजरा करतात. या उत्सवामध्ये आपल्या शेतीत जो वर्षभर प्रामाणिक, उत्तम काम करतो. त्याला आपण मांडवसला पुन्हा वर्षभर काम करण्याची संधी देतो. आणि जो काम चुकारपणा करतो, त्याला कायमची सुट्टी देतो. आपल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा लेखा जोखा बघितला तर विकास कामे झालेली दिसत नाही. त्यामुळे आज मांडवस उत्सव आहे, याच महिन्यात लोकसभा निवडणुक आहे. तुम्ही सर्व मला लोकसभेत पाठवून मांडवसची भेट द्या. आपण माझ्यावर विश्वास ठेवून या मांडवसला लोकसभेत पाठवले तर मी जीव ओतून काम करेल, असे आवाहन भाजपा लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
===========================
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जाहीर वरोरा तालुक्यातील सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा आणि बारव्हा येथे प्रचार आणि जाहीर सभा पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी गुढीपाडवा आणि मांडवसचा अर्थ उलगडून सांगितला. ते म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातील आहे. कष्टकरी शेतकरी मजूर बेरोजगार बेघर वंचित लोकांसाठी मी जीव तोडून काम करेल. जर मी काम केलें नाही तर मला पण सुट्टी द्या, असे भावनिक आवाहन ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आज मला येथील अनेक लोकांनी भेटून वरोरा ते शेगाव रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली व काही नागरिकांनी निवेदन दिले. मागील साडेचार वर्षात काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार यांनी काहीही काम केले नाही. त्यामुळे आज येथील रस्त्यात चालताना उडी मारतो की काय? असे चित्र दिसून येते. आपण निवडून आल्यानंतर प्राधान्याने येथील रस्त्याचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, घाणेरडे राजकारण केले नाही. मला एक दिवस ताप आला तरी काँग्रेसने त्याचे घाणेरडे राजकारण केले, पण मी विकासाचा राजकारण करतो विकासावर बोलतो. विकास हाच माझा प्रमुख मुद्दा आहे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना माझा आदर्श आमदार म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. मागील २९ वर्षापासून मी आमदार आहे मला विधानसभेत काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर मी संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करेल याचा तुम्हाला विश्वास देतो असे ते म्हणाले. वरोरा, सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा, बारव्हा येथे आयोजित सभेला विजय राऊत, डॉ. बोदकुलवार, इंजी. बोदकुलवार, रमेश राजूरकर, सागर कोहळे, गौरव हेकाळे, नितीन मते, सदाशिव ताजने, किशोर टोंगे, भगवान गायकवाड, डॉ. अंकुश आगलावे, वंदना दाते, संगीता निंबाळकर, ओम मांडवकर, अमित चवले, आशिष ठाकरे, स्वाती बावने, कल्पना तुमरे, अर्चना चौधरी, अती शाम अली, सुनील वर्धे, सुमित वर्धे, निर्मला वर्धे, किसन वर्धे, मंजुळा दडमल, वनिता नरड, रूपाली नरड, स्नेहा लोकरे, चंदा खारकर, मंजुषा ताजने, शीतल साळवे, शिवानी साळवे, राजु गायकवाड, किरन ढोक, मारोती जांभळे, सरपंच वर्षा सरतापे, वासुदेव शेंडे, उमेश भुते, मोरेश्वर डुकरे, सिंधु जुमले, शुभम डाफ, विजय बोकासे, करन देवतळे, कविता बोराडे, गोपाळ गोगावले, किशोर पडोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
=============================
सायबर क्राईमकडे करणार काँगेसची तक्रार…
काँग्रेसने दंगल घडवून १९८४ ला आणीबाणीच्या काळात शीख बांधवांना प्रचंड त्रास दिला, अन्याय अत्याचार केला, याचा अर्धवट व्हिडिओ कट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या दंगलीत काँग्रेसने किती अन्याय अत्याचार केले हे सर्वश्रुत असताना मीडियामध्ये कुठलाही विपर्यास केलेला नाही. पण काँग्रेस मुद्दामपणे जनतेची दिशाभूल करण्यासाठी अर्धवट व्हिडिओ व्हायरल करने सुरू केले आहे. त्यामुळे याची आपण सायबर क्राईमकडे तक्रार करणार आहोत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करू असे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
==========================
शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश…
देशाचे कर्तबगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर, लोकसभा उमेदवार ना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते रोज भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. आज वरोरा, सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा, बारर्व्हा आदी क्षेत्रांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला. यामध्ये अनिल लोळे, मंगेश फुलकर, देवराव ढोके, नंदु फुलकर, देवराव नलावटे, प्रदीप चवरे, प्रणय नरड, नवजीवन मत्ते, दिनेश कावळे, भाउराव सोनुने, सूरज सहारे, आनंद पेटकर, विकास कष्टी, गुणवंत देहरकर, तुळशीराम साखरकर, प्रभाकर पेंदोर, भारत कुमरे, राजेंद्र जुगणाके, सुरेश किंन्नाके, आकाश ओयाम, आकाश भगत, रीतिक सोयाम, निलेश पेंदोर, मनोहर मेश्राम, अरूण चांभारे, दिवाकर जुमणाके, नंदकिशोर चिडे, प्रभाकर नाथे, कैलास येरमे, सौरभ टोंगे, सौरभ जुमणाके यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालिकरिता शुभेच्छा दिल्या.
===========================
वरोरा येथे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत...
चंद्रपूर लोकसभा भाजपा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आज मंगळवारी सकाळी वरोरा येथे आगमन होताच भगव्या सांस्कृतिक वाद्य पथकाच्या ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी श्री राम मंदिर येथे पुष्पहार अर्पण करून श्रीराम यांचे दर्शन आशीर्वाद घेतले. तसेच मुख्य चौकातील स्वातंत्र्य विर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी राम मंदिर वरोराचे अध्यक्ष ऍड. जयंता ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी डॉ. सागर वझे, बाबा भाकरे, गोडे मॅडम, घनश्याम गोडे उपस्थित होते.
============================
काँग्रेसला मत म्हणजे विनाशच विनाश..
कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तरी ते कडूच राहते गोड होत नाही. तशीच अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे, आज पर्यंत काँग्रेसने जनतेची निराशा केली आहे. त्यामुळे वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. या विभागाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कमळला मतदान करा, विकास म्हणजे कमळ आणि काँग्रेस म्हणजे विनाशच विनाश, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,