फुटपाथवरील त्या विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा द्या महानगर भाजपाचे मनपाला निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडेंच्या नेतृत्वात आयुक्तांशी चर्चा

0
36

================================

फुटपाथवरील त्या विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा द्या
=============================
महानगर भाजपाचे मनपाला निवेदन
============================
भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडेंच्या नेतृत्वात आयुक्तांशी चर्चा
============================
चंद्रपूर ब्युरो
==========================
येथील बंगाली कॅम्प परिसरातील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या विविध वस्तू व जीवनावश्यक साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी महानगर भारतीय जनता पार्टीने महानगर पालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.या संदर्भात भाजपाच्या एका  शिष्ठ मंडळाने ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात आयुक्त विपीन पालिवाल यांची भेट घेत निवेदन सादर केले.
यावेळी भाजपा महानगर महामंत्री ,प्रज्वलंत कडू,डॉ.मंगेश गुलवाडे,किरण बुटले,भाजपा नेते रेणू घोडेस्वार व अजय सरकार यांची उपस्थिती होती.
============================
यावेळी पावडे म्हणाले,मनपा प्रशासनाच्या माध्यमातुन करण्यात येणाऱ्या अतिक्रमणच्या कार्यवाहीचा फटका फुटपाथ वरील व्यवसायिकांना सोसावा लागत आहे. अनेक वर्षापासुन बंगाली कॅम्प येथील रस्त्यावर व्यवसाय करत असलेले भाजीपाला, फळ विक्रेते व ठेलेवाले यांचे कुटुंब कारवाईमुळे उघड्यावर आले आहे.हीच स्थिती शहरातील इतर भागातही आहे.तळहातावर कमवून ही मंडळी परिवारचे पालनपोषण करीत आहे.याचा संवेदनशील मनाने विचार करून त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी यावेळी चर्चे दरम्यान पावडे यांनी केली.
==============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here