*शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळाले नोटबुक*

0
25

===============================

*शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळाले नोटबुक*

==============================

*अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या उपक्रमाने विद्यार्थी भारावले*

==============================

चंद्रपूर : आपल्या विविध सामाजिक उपक्रमातून लोकहिताचे कार्य करण्यास सदा अग्रेसर असलेल्या चंद्रपुरातील अवंती – अंबर प्रतिष्ठानने शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. आज 1 जुलैला शाळेचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी चंद्रपूर तालुक्यातील खुटाळा येथील
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उच्च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुटाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय नोटबुक वाटप करण्यात आले . शाळेच्या पहिल्या दिवशी नोटबुक मिळयाल्याने विद्यार्थी आनंदित झाले होते.
आज “अवंती अंबर सामाजिक प्रतिष्ठान चंद्रपूर”तर्फे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले याप्रसंगी अवंती अंबर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाऊ मेंढे , शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभारत्न अंडरस्कर मॅडम गेडाम सर,बम्बोडे मैडम, वंजारी मॅडम खणके सर, मॅडम,बिडेकर मैडम,गणवीर मैडम,सागोडे मैडम, कोसरा ग्रामपंचायतचे उपरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम,दीक्षांत कांबले,सर्वेश पिसे तसेच संपूर्ण शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती,

================================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here