चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील शासकीय कृषी महाविद्याचे वेतननेतर अनुदान वितरीत करण्यासाठी १ कोटी ८० लाख ऐवढे अनुदान राज्य शासनाने मंजूर केले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाने दिनांक ११ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक १० मार्च २०२२ रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करत मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी तसेच वेतनेतर अनुदानासाठी निधी मंजूर व्हावा अशी मागणी केली होती. त्यानुसार दिनांक १६ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ६४.५९ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र सदर कृषी महाविद्यालयाचे प्रलंबित वेतनेतर अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात ६ जुलै २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर कृषी महाविद्यालयाच्या कामाला गती प्राप्त व्हावी यादृष्टीने उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत वेतनेतर अनुदानाचे १ कोटी ८० लक्ष रू. तातडीने वितरीत करण्याच्या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने मुल येथील कृषी महाविद्यालयासाठी १ कोटी ८० लक्ष रू. अनुदान वितरीत करण्यात आले आहे. आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी सदर कृषी महाविद्यालयाच्या एकुणच कामकाजाला या माध्यमातुन गती प्राप्त होणार आहे.