आज सकाळी एसीसी कंपनी मध्ये एका निर्दोष कामगाराचा जीव गेला. खूप दिवसान पासून एसीसी कंपनी मध्ये हुकूमशाहीची प्रथा चालू आहे. त्या हुकूमशाही विरुद्ध काही कामगारांनी आवाज उचलला. निती प्रमाणे एसीसी कंपनीने त्या कामगारांमध्ये फुट पाडाचा खूप प्रयन्त केला. ते नाही जमले मग् त्यांना गुंडानं कडून मारहाण केली. तेव्हा सुद्धा कामगार डगमगले नाही आणि एसीसी कंपनी समोर नाही झुकल्यामुडे त्या ४ कामगारांना दि. १९/०७/२०२२ रोजी अखेर ड्युटीवरुन् काढण्यात आले. हि बातमी आज दि. २०/०७/२०२२ त्या कामगारांच्या साथीदाराला कळलि. त्या बातमी मुळे एसीसी कंपनीच्या कामगारांमधे खडबल माजली. सगडे याचं विचारात पडले की हि कंपनी कुठल्याही कामगारांना केव्हाही त्यांच्या मनात आले तेव्हा बरखास्त करू शकते. केव्हाही आपल्याला बेरोजगार करू शकते. ह्या गोष्टीचा हरिदास मोहजे या कामगारावर खूप मोठा परिणाम पडला कारण ज्या ४ कामगार लोकांनी आपल्या व आपल्या साथीदारांच्या हक्कासाठी कंपनी पीएफ चोरी झाल्यास कंपनीचा विरोधात लढा दिला. ते हरिदास मोहजे याचे साथीदार व जिवलग सहकारी होते. ते सगडे हरिदास मोहजे बरोबर पॅकिंग हाउस मध्ये कार्यरत होते. एकाएकी असे दृश्य दिसल्यावर हरिदास मोहजे हा खचून गेला. आता आपल काय होईल या टेंशन मुळे त्याला एसीसी कंपनी मध्ये ऑन ड्युटी आज दि. २०/०७/२०२२ रोजी सकाळी हार्ट अटॅक आला व तो जागीच मरण पावला. मी सुरेश मल्हारी पाइकराव आज त्या कंपनीच्या कामगारांना हात जोडून विनंती करतो. की आता तरी जागे व्हा. आज जर हे अत्याचार सहन केले तर समोर या जागी आपण सुद्धा असू शकता. मी सुरेश मल्हारी पाईकराव मी हरिदास मोहजेला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी मला एकट लढावं लागल तरी चालेल. पण मी कामगाराच्या हितासाठी न्याय मिळवून दिला शिवाय मी गप्प बसणार नाही. हरिदास मोहजे यांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून कंपनीने पन्नास लाख रुपये व परिवारातील एक सदस्याला नौकरी देण्यात यावी अन्यथा न दिल्यास मृत्यु हरीदास मोहजे यांच्या परिवाराला घेऊन आंदोलन करणार