पंचशिल चौक बाबुपेठ वार्ड चंद्रपूर येथे घराची भिंत पडून तिन व्‍यक्‍ती जखमी जखमींना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडून आर्थिक मदत.

0
90

चंद्रपूर जिल्‍हयात गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून अतिवृष्‍टीमुळे पुरस्थितीती निर्माण झालेली आहे. या अतिवृष्‍टीमुळे पंचशिल चौक बाबुपेठ वार्ड, चंद्रपूर येथे घरांची भिंत कोसळल्‍याने सौ. मंजुषाताई राकेशरोशन बारसागडे, प्रक्षिक राकेशरोशन बारसागडे व आर्यन राकेशरोशन बारसागडे हे गंभीर जखमी झाले आहे. या तिनही जखमींना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्‍काळ मदत करून प्रशासनालाही मदतीचे आदेश दिले आहे.

 

दिनांक २३ जुलै २०२२ रोजी पंचशील चौक बाबुपेठ येथे सौ. मंजुषाताई राकेशरोशन बारसागडे व सौ. बेबीनंदाताई मनराज कातकर यांचे पूर्णपणे घर कोसळले. त्‍यामुळे घरातील सौ. मंजुषाताई बारसागडे, प्रक्षिक बारसागडे व आर्यन बारसागडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. त्‍यांना तात्‍काळ शासकीय रूग्‍णालयात भरती करण्‍यात आले. या कठीण प्रसंगी आपण मदतीचा हात दिलाच पाहीजे. गोरगरीबांच्‍या दुःखात आपण सहभागी असलो पाहीजे या भावनेतुन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वतीने धान्‍य किट, ताडपत्री व आर्थिक मदत करण्‍यात आली. या मदती प्रसंगी भाजपा महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजपा महानगर मंडळ अध्‍यक्ष संदीप आगलावे, माजी मनपा सदस्‍या वंदना बगुलकर, माता कन्‍यका सेवा संस्‍थेचे सचिव राजेश सुरावार, दशरथ सोनकुसरे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. पिडीत दोन्‍ही कुटूंबांना नुकसान भरपाई देवून शासनाद्वारे वैद्यकिय खर्चाकरिता आर्थिक मदत उपलब्‍ध करून देण्‍यात यावी, असा आदेश पत्रव्‍यवहार करून प्रशासनाला आ. मुनगंटीवार यांनी दिले.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here