घर तिरंगा’’ हा कार्यक्रम राबविणे हा माझ्या जीवनातील सर्वोच्‍च आनंदाचा क्षण – आ. मुनगंटीवार आ. मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर येथे घेतला कार्यक्रमाच्‍या तयारीचा आढावा.

0
72

देशगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या संकल्‍पनेतुन हर घर तिरंगा ही योजना संपूर्ण देशभर राबविण्‍याचे ठरले आहे. ही योजना चंद्रपूर जिल्‍हयात सुध्‍दा पूर्ण शक्‍तीने यशस्‍वी करावयाची आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाच्‍या पूर्वतयारीसाठी बल्‍लारपूर येथे घेतलेल्‍या बैठकीत बोलताना केले.

यावेळी आ. मुनगंटीवार म्‍हणाले, की हर घर तिरंगा हा कार्यक्रम माझ्या जीवनातील सर्वोच्‍च आनंदाचा क्षण आहे. राजकीय जीवनात अनेक विजय मिळविले, अनेक योजना व निधी जिल्‍हयांसाठी राबविला, अनेक आरोग्‍यदायी योजना राबविल्‍या. परंतु ज्‍या स्‍वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्‍या त्‍यागामुळे व तिरंगा झेंडयामुळे आपल्‍या देशाला स्‍वातंत्र्य मिळाले. त्‍या देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाप्रसंगी या योजनेत सहभागी होता आले याचा मला अतिशय आनंद होत आहे, असेही आ. मुनगंटीवार याप्रसंगी म्‍हणाले. बैठकीच्‍या सुरूवातीला त्‍यांनी त्‍यांच्‍या वाढदिवसाला अनेक लोकोपयोगी कार्यक्रम केल्‍याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांचे आभार मानले.

याप्रसंगी शहरातील १७ प्रभागांच्‍या भाजपा पदाधिका-यांच्‍या संघटन पुस्तिकेचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते झाले याचे आ. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. यावेळी मनिष रामील्‍ला यांची भाजपा तेलुगु आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्षपदी तसेच कैलास गुप्‍ता यांची भाजपा उत्‍तर भारतीय मोर्चाच्‍या जिल्‍हा सरचिटणीसपदी नियुक्‍ती करण्‍यात आल्‍याची घोषणा करण्‍यात आली. या दोघांचेही आ. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.

हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने बल्‍लारशाह शहरातील सर्व घरी (अंदाजे १७,२००) आपल्‍या कार्यकर्त्‍यांनी झेंडा, दंडा, प्रतिज्ञापत्र द्यावयाचे आहे व १३ ऑगस्‍ट ते १५ ऑगस्‍ट या दरम्‍यान शासकीय नियमानुसार तो झेंडा प्रत्‍येक घरी लावण्‍यासंदर्भात्‍ सुचना द्यावयाच्‍या आहेत. यासाठी एक कार्यकर्ता २० घरे असे नियोजन करावे म्‍हणजे प्रत्‍येकाला काम करणे सौपे जाईल. यासाठी जास्‍तीत जास्‍त व्हिडीओ स्‍लोगनसहीत मेसेजेस बनवावे व ते सोशल मिडीयावर टाकावे. जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत ते पोचतील याची काळजी घ्‍यावी. याच विषयावरचे फ्लेक्‍स बोर्ड तयार करून गावात जास्‍तीत जास्‍त ठिकाणी लावावे. १५ ऑगस्‍टला देशभक्‍तीपर गीते, रांगोळी व अन्‍य कार्यक्रमांचे पक्षातर्फे आयोजन करावे. चौकाचौकात वेगवेगळया वेशभूषांचे ज्‍यामध्‍ये स्‍वातंत्र्य संग्राम सैनिकांचा व शहीदांचा समावेश असेल अशी मुले किंवा माणसे उभी ठेवावी. शक्‍य असेल तर त्‍यादिवशी चित्रकला स्‍पर्धा घेवून विजेत्‍यांना चांगले पुरस्‍कार व सर्वांना सहभाग प्रमाणपत्र द्यावे. लहान मुलांच्‍या हातुन वेगवेगळया ठिकाणी तिरंग्‍यांचे हायड्रोजन फुगे सोडावे. मैं और मेरा तिरंगा या अॅपवर स्‍वतः तिरंगा झेंडा घेवून सेल्‍फी काढावी व टाकावी. यासर्व कार्यक्रमांच्‍या आयोजनासंबंधात प्रमुख पदाधिका-यांनी एक पत्रकार परिषद घेवून माहिती द्यावी. भाजपा प्रथम देश, मग पक्ष, मग मी या धोरणावर चालणारा पक्ष आहे हे सर्वांनी ध्‍यानात घ्‍यावे व पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम अतिशय उत्‍साहाने व जोशाने करावे, असे आवाहन याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी केले.

बैठकीला ज्‍येष्‍ठ भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, माजी नगरध्‍यक्ष हरीश शर्मा, माजी नगराध्‍यक्ष लखनसिंह चंदेल, शहर अध्‍यक्ष काशीनाथ सिंह, अॅड. रणंजय सिंह, भाजयुमोचे जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, समीर केने, मनीष पांडे, सतविंदरसिंग दारी, सौ. वैशाली जोशी, जुम्‍मन शेख, मनिष रामिल्‍ला, कैलास गुप्‍ता, सर्व माजी नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here