विठ्ठल मंदिर प्रभाग क्र.ञ १५ येथील देशगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतुन हर घर तिरंगा ही योजना संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. तसेच विठ्ठल मंदिर प्रभागात हर घर तिरंगा योजना कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रभागाचे अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, माझी नगरसेवक सौ. संगीता खांडेकर, विशाल निंबाळकर, ओबीसी अध्यक्ष विनोद शेरकी, भाजपा सचिव राजेंद्र खांडेकर, सुर्यकांत कुचनवार, सुरेश तालेवार, राजु जोशी, ललित मुल्लेवार व भाजपाचे असंख्य पुरुष महिला कार्यकर्ता मोठया संख्येने सहभाग घेवुन हर घर तिरंगा कार्यक्रम यशस्वी करावा दि. १३ ते १५ ऑगस्ट हर घर तिरंगा ध्वज कार्यक्रम सकाळी ०९.०० वा. सुरु होईल. तरी प्रभागातील सर्व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















