Home चंद्रपूर खुटाळा व पडोली येथे सिमेंट काॅंक्रीट रोड व नाली बांधकामाचे भूमीपुजन. युवा...
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का.प्र.) : तालुक्यातील खुटाळा व पडोली येथील गावांच्या मध्यभागातून जाणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.
त्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या संदर्भात गावकऱ्यांनी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या मांडली होती.
त्यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री जिल्हा खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत खुटाळा येथे प्रफुल वधारे यांच्या घरापासून परिवर्तन प्लाझापर्यंत सिमेंट काॅंक्रीट रस्ता तसेच पडोली येथे कासवटे यांच्या घरापासून गौरकार यांच्या घरापर्यंत नाली बांधकामास मंजुरी मिळाली.
सदर विकासकामांचे भुमिपूजन भाजपा युवा नेते रघुवीर अहीर यांच्या शुभहस्ते शनिवार 10 मे 2026 रोजी उत्साहपुर्ण वातावरणात पार पडले.
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने युवा नेते रघुवीर अहीर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हे ग्रामिण भागाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खनिज विकास निधी अंतर्गत तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत.
भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम करण्यात येईल असे प्रतिपादन युवा नेते रघुवीर अहीर यांनी केले.
याप्रसंगी भाजपा ग्रामिण तालुकाध्यक्ष विनोद खेवले, नकुल वासमवार, सरपंच विक्की लाडसे, अजय चार्लेकर, भारत रोहणे, निवृत्ती शिंदे, घनश्याम मुरकूटे, ग्रामिण महिला आघाडीच्या दुर्गा बावणे, राधा वांढरे, ललिता चार्लेकर, मिरा पायघन, सरिता गोटेफोडे, कौरासिया आदी प्रमुख पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते तसेच खुटाळा व पडोली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्ता व नाली बांधकामामुळे गावातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारची विकासकामे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069* *बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻*Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com**9860030082*