HELLO CHANDA NEWS
गडचिरोली,(वि. प्र.) : प्रशासकीय कामे अधिक गतिमान व्हावीत आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने गडचिरोली तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)’ राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या नियोजनासाठी तहसीलदार सागर कांबळे यांनी 04/03/2026 रोजी तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची सभा आयोजित केली होती. सर्व शासकीय विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या शिबिरांचा लाभ पोहचवण्याचे व शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन केले.
मिळणाऱ्या प्रमुख सेवा:
या शिबिरांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या 15 सेवा पुरविण्यात येणार आहेत. खालील महत्त्वाच्या सेवा जागेवरच पुरवल्या जाणार आहेत:
प्रलंबित फेरफार आणि ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती.
उत्पन्न, रहिवासी, जातीचे आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र वाटप.
डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप.
पी.एम. किसान नोंदणी आणि रेशन कार्ड संदर्भातील कामे.
अकृषक (NA) परवानगी, ‘सनद’ प्रक्रिया आणि ॲग्रीस्टॅक योजना.
विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक दाखले.
शिबिरांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
०७/०३/२०२६
शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, पोर्ला
१४/०३/२०२६
मंडळ कार्यालय, बाम्हणी
१०/०४/२०२६
जि.प. प्राथ. शाळा, पोटेगाव
१७/०४/२०२६
साईनाथ विद्यालय, येवली
०८/०५/२०२६
नगर परिषद, गडचिरोली
“पारदर्शक आणि लोकाभिमुख महसूल प्रशासन” हे या अभियानाचे मुख्य सूत्र आहे. नागरिकांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तारखेला उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात येत आहे.


























