Home
Home चंद्रपूर गडचांदूर पोलिसांची मोठी कारवाई; १,३९,९४२/- रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त..

गडचांदूर पोलिसांची मोठी कारवाई; १,३९,९४२/- रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त..

0
22

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) : महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाला विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरने धडक कारवाई केली आहे.

   गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत तब्बल १,३९,९४२/- रुपये किमतीचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील,

    १९.०५.२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा करून तो विक्री केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

        या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ संबंधित संशयित इसमाच्या घरावर छापा टाकला.

 या छाप्यात वेगवेगळ्या कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल व आरोपी,

     याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे.अपराध क्रमांक ३३०/२६ भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      पाहिजे असलेला आरोपी: समीर सागीर अहमद सिद्दकी (रा. नांदा, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

        वेगवेगळ्या प्रकारचे एकूण २२ प्रकारचे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाला.

   एकूण जप्त मुद्देमाल किंमत: १,३९,९४२/- रुपये  एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे बेचाळीस रुपये.

                      कारवाई करणारे पथक:
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर आणि उपविभाग गडचांदूर पथकाद्वारे यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

       अवाहन: जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित अंमली पदार्थ, सुगंधित तंबाखू अथवा गुटख्याची बेकायदेशीर विक्री किंवा साठवणूक होत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here