संस्कार भारती चंद्रपूर या संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधुन दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी कृष्ण रूपसज्जा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायं. ५.०० ते ७.०० वा. दरम्यान चंद्रपूरातील दुधडेअरी नजिकच्या आश्रय बालकाश्रम येथे आयोजित या स्पर्धेसाठी दोन गट निश्चीत करण्यात आले आहे. १ ते ५ वर्षे आणि ६ ते १० वर्षे अश्या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत केवळ घरगुती सामानाचा वापर करून कृष्ण रूप सज्जा करावयाची आहे. दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांक १०००/- रू. रोख, द्वितीय क्रमांक ७०१/- रू. रोख, तृतीय क्रमांक ५०१/- रू. रोख व प्रमाणपत्र तसेच १५१/- रू. रोख रकमेचे दोन उत्तेजनार्थ पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रवेशासाठी लिलेश बरदाळकर ९९६०२३१४१०, प्रविण ढगे ९५४५२३१८०१ आणि राज ताटपल्लीवार ७६२०४२१४६१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधायचा आहे. स्पर्धेसाठी १००/- रू. प्रवेश शुल्क निश्चीत करण्यात आले आहे.
कृष्ण रूपसज्जा स्पर्धेआधी संस्कार भारतीतर्फे गुरूपुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात चंद्रपूरातील ज्येष्ठ गायिका सुरेखाताई दुधलकर यांचा सत्कार गुरू म्हणून करण्यात येणार आहे व त्यानंतर कृष्ण रूपसज्जा स्पर्धा संपन्न होईल. स्पर्धेनंतर लगेच पारितोषीक वितरण समारंभ संपन्न होईल. या स्पर्धेत मोठया संख्येने बालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्कार भारती चंद्रपूरतर्फे करण्यात आले आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793