पक्षीय चष्म्यातून राष्ट्रध्वजाकडे बघू नका ज्येष्ठ विचारवंत डॉ.शेवडे यांचे आवाहन

0
56
चंद्रपूर ब्युरो
तिरंगा ध्वज स्वीकारल्या नंतर आता तो माझा झेंडा आहे ही भावना सर्वांची असायला हवी. स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा यावर 1947 पूर्वी व्यक्त केलेल्या मतांना आधार बनवून कुणावर टिका करणे आणि केवळ पक्षीय चष्म्यातून तिरंगा बघणे योग्य नाही. राष्ट्रध्वजावरून वाद उकरून काढणे यापेक्षा या देशाचे दुसरे दुर्दैव असू शकत नाही. पक्षीय चष्म्यातून राष्ट्रध्वजाकडे बघू नका असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे पत्रपरिषदेत केले.बुधवार, 10ऑगस्टला दुपारी येथील एन. डी. हॉटेलला आयोजित पत्रपरिषदेत डॉ. शेवडे यांच्यासह डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सचिव अनिल बोरगमवार, कोषाध्यक्ष राजीव गोलीवार, संस्थापक सदस्य प्रकाश धारणे उपस्थिती होती.डॉ शेवडे म्हणाले, लंडन
म्युनिसिपल कॉन्सिलने ओल्ड इंडिया हाऊसवर, सावरकर जेथे राहत होते तेथे अजूनही नीलफलक लावला आहे. पण आपल्या देशात मात्र, सावरकर असतानाही आणि ते  गेल्याला अर्धशतकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्यांची अवहेलना होतच आहे. परकीय देशात क्रांती करणाऱ्या आणि तेथील कारागृहात राहणाऱ्या नेल्सन मंडेला यांना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान दिला गेला. पण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आल्यावरही या देशासाठी हालअपेष्टा सोसलेल्या वीर सावरकरांना भारतरत्न दिले जात नाही याला काय म्हणावे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सर्वांचेच योगदान आहे. आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य मिळवण्याकरिता जे जे मार्ग अवलंबले गेले, त्या सर्व मार्गांचा आणि ते अवलंबणाऱ्या सर्व लोकांचा यथोचित सन्मान होणे आवश्यक आहे. तेव्हाच ‘घर घर तिरंगा’ या मोहिमेला बळ प्राप्त होऊ शकेल, असे ते म्हणाले.माफीमुळे ‘त्यांची सुटका’ अजिबात झाली नाही
सावरकरांच्या कथित माफीनाम्याबद्दलही डॉ शेवडे बोलते झाले.सावरकरांनी दाखल केलेली ‘इम्नेस्टी पिटीशन’ होती.या पिटीशनला मराठीत प्रतिशब्द नाही. त्याचा मराठीत अर्थ माफीनामा होऊ शकत नाही. जे त्यावेळी ब्रिटीशांच्या ‘जेल मॅन्यूअल’मध्ये तरतूद होती, त्याचाच वापर करायचा आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा सावरकरांचा हेतू होता. याच माध्यमातून त्यांनी अनेकांची तुरंगातून सुटका केली.पण हा विषय समजून घेतला जात नाही.ही सवलत सावरकरांना मिळाली नाही. त्यांच्या अर्जांवर ब्रिटिशांनी 10 वर्ष कारवाई केली नाही.1920 ला शेवटचे पत्र दिल्यावर 1921मध्ये ब्रिटिशांनी कारवाई केली.फक्त जागेचा बदल झाला.त्यामुळे माफीमुळे त्यांची सुटका अजिबात झाली नाही. ब्रिटिशांची भूमिका स्पष्ट होती, केवळ जागेत बदल, सुटका नव्हे! त्यामुळे आता सावरकरांवर टिका करणाऱ्यांपेक्षा तेव्हाचे ब्रिटिशच जास्त चांगले होते. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, अशी टिकाही डॉ. शेवडे यांनी केली.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here