पुरग्रस्तांना पुन्हा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदतीचा हात पूरग्रस्तांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या निवा-यात भोजन व्यवस्था

0
84

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर पुन्हा एकदा यंग चांदा ब्रिगेड पुरग्रस्तांच्या मदतीला धावली असुन पुराचे पाणी घरात शिरल्याने प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या अस्थायी निवा-यात आश्रयास असलेल्या पुरग्रस्तांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन आणि यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे परिश्रम घेत आहे.

पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने चंद्रपूरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे. यात रहमत नगर, भिवापूर वार्डातील भंगारात प्रभाग अधिक प्रभावित झाला आहे. येथील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने प्रशासनाच्या वतीने त्यांची दुस-या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी पुरग्रस्तांना अडचणी येत आहेत. याची दखल घेत येथे आश्रयास असलेल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता यंग चांदा ब्रिगेड पुन्हा एकदा समोर आली आहे. पुरग्रस्त नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेल्या किदवाई विद्यालय, फुले शाळा, के.जी.एन लॉन, माना प्राथमिक शाळा, भगत सिंह प्राथमिक शाळा येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पुरग्रस्तांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असुन सदर परिस्थिती आटोक्यात येतपर्यंत ही भोजन व्यवस्था सुरुच राहणार असल्याचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here