*मा. खा.अशोक नेते यांनी घेतली विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट*

0
11

==============================

*रुग्णांना येणाऱ्या समस्यांवर शल्य चिकित्सकांशी चर्चा*       ===============================       दि.०६ जुलै २०२४ ==============================     गडचिरोली : बारश्याच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहारी जेवणातून विषबाधा झालेल्या रोपिनगट्टा या गावातील बाधित रुग्णांची माजी खा.अशोक नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेतली. रुग्णांवर योग्य उपचार होऊन प्रकृतीत सुधारणा होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रुग्णांनी त्यांच्याकडे मांडलेल्या रुग्णालयाच्या परिसरातील व्यवस्था आणि इतर काही अडचणींबद्दल नेते यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सतीशकुमार सोळंके यांच्याशी चर्चा करून त्या अडचणी दूर करण्याची सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला केली. ==============================          धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायतअंतर्गत रोपिनगट्टा या गावात 4 जुलैला अन्नातून विषबाधेची घटना घडली होती. रोपिनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातीच्या नामकरण विधीमध्ये मांसाहाराचे जेवण होते. यावेळी पहिल्याच पंगतीत बसलेल्या जवळपास 30 लोकांना काही वेळातच उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे दुसरी पंगत थांबविण्यात आली. सुरूवातीला पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर 22 जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर सहा जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले. यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात 5 बालकांचाही समावेश आहे. त्यातील एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. ===============================             या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी आज दि.६ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोळंके यांच्याशी चर्चा केली. यावेळी रुग्णालयाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे, त्यामुळे रुग्णांना होत असलेला त्रास, नवीन गेटच्या उभारणीमुळे होत असलेली अडचण,रुग्ण वार्डातील रूमाच्या बांधकामाबाबत समस्या आदी समस्या दूर करण्याची सूचना अशोक नेते यांनी केली. ==============================         यावेळी नेते यांनी प्रस्तावित मेडिकल कॉलेजच्या कामाच्या प्रगतीवरही चर्चा केली. त्यासाठी लागणाऱ्या शासनस्तरावरील अडचणी दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगत नेते यांनी मेडीकल कॅालेजची पहिली बँच यावर्षीच सुरू करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची सूचना आरोग्य विभागाला केली. =============================            यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिशकुमार सोळंके, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,डॉ.मनिष मेश्राम,व्याहाड खुर्दचे नानाजी बोबाटे,सामदा बुजचे दुमाजी जेट्टीवार तसेच मोठ्या संख्येने  रुग्णांचे नातेवाईक उपस्थिती होते.         ===============================       *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी  संपादक शशिकांत मोकासे ===============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here