*जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायत येथील संगणक परीचालकांचे वेतन त्वरित द्या :- नितीन भटारकर*

0
78

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे मागणी अन्यथा आंदोलन.

मागील ०४ महिन्यांपासून वेतन थकित, मानधन न मिळाल्याने ६०० हून अधिक संगणक चालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन आहे सुरू.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना होतो आहे त्रास.

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायत अंतर्गत संगणक परिचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांचे मागील ०४ महिन्यांचे थकित मानधन मिळत नसल्याने जिल्ह्यातील संगणक परिचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

गेल्या १२ वर्षापासून संगणक परिचालक जिल्यातील ग्रामपंचायत कार्यालय येथे ऑनलाईन तथा ऑफलाईन कामे करीत आहे. यांच्या माध्यमातुन ग्रामपंचायत स्तरावरील कार्यालयीन कामकाजासह गावातील सर्व सामान्य नागरीकांना जन्म – मृत्यु दाखला, गाव नमुना ८, विवाह नोंदणी अश्या सर्व सेवा देण्यात येते. कामाच्या मोबदल्यात या परिचालकांना तुटपुंजे मानधन मिळते, मात्र मागील ४ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेक परिचालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

मात्र मागील ४ महिन्यांपासून रखडलेल्या वेतनामुळे यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा सर्व सामान्य नागरिकांना फटका बसतो आहे.

डिजीटल महाराष्ट्र व डिजीटल इंडिया करण्याच्या हेतूने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार प्रयत्नशिल असून त्याचा मुख्य दुआ म्हणून ग्रामीण पातळीवरील कामकाज सदर परिचालक जबाबदारीने पुर्ण करीत असून सुध्दा या परिचालकांच्या या ज्वलंत समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष्य करीत आहे.

थकित मानधनाबाबत दिड महिन्याआधी जिला प्रशासन व कंपनी यांना महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटने मार्फत निवेदन देण्यात आले होते, परंतु दुर्दैवाने त्यावर कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही.

व म्हणून परीचालकांवर होणारा अन्याय व सर्व सामन्यांची होणारी गैरसोय दूर करन्याकरिता परीचालकांचे थकित असलेले वेतन तात्काळ द्यावे या मागणीचे निवेदन आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात दिले.

येणाऱ्या १५ दिवसांच्या आत जिल्यातील संपूर्ण ग्रामपंचायत येथील संगणक परीचालकांचे वेतन न दिल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदे समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नितीन भटारकर यांनी दिला.

निवेदन देताना प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे चंद्रपूर तालुका अध्यक्ष विकास ढोके, पंचायत समिती सदस्य पंकज ढेगारे, रायुकाँ जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सेजुल, नितीन घुबडे उपस्थित होते.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here