श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी नागपूरहून चंद्रपूरकडे रवाना झाल्यानंतर दुपारी २.४५ वा. जाम पुढील नंदोरी चौकात त्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३.०० वा., खांबाडा येथे, दुपारी ३.३० वा. टेमुर्डा येथे, सायं. ४.०० वा. आनंदवन चौक, सायं. ४.१५ वा. नंदोरी, सायं. ४.४५ वा. कोंढा फाटा, सायं. ५.०० वा. भद्रावती, सायं. ५.२० वा. घोडपेठ, सायं. ५.३० साखरवाही फाटा, सायं. ५.४५ वा. मोरवा बसस्टॅन्ड चौक, सायं. ५.५० वा. डी.एन.आर. ऑफीस पडोली, सायं. ६.०० वा. पडोली चौक, सायं. ६.१५ वा. शर्मा पेट्रोलपंप चौक पडोली येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
चंदपूर महानगरात प्रवेशताच श्री. सुधीरभाऊंचे सायं. ६.३० वा. हॉटेल ट्रायस्टार नजिक स्वागत करण्यात येईल. त्यानंतर सायं. ६.४० वा. एन.डी. हॉटेलजवळ, सायं. ६.५० वा. जनता कॉलेजजवळ, सायं. ७.१० वा. वरोरा नाका, सायं. ७.२० वा. रेस्टहाऊस समोरील दर्गा, सायं. ७.३० वा. संजय गांधी मार्केट, सायं. ७.४० वा. प्रियदर्शिनी चौक, सायं. ७.५० वा. जटपुरा गेट येथे लाडुतुला, रात्री ८.१५ वा. छोटा बाजार चौक, रात्री ८.३० वा. चर्चसमोर जयंत टॉकीज चौक, रात्री ८.५० वा. बगीचा समोर, रात्री ९.०० वा. लक्ष्मीनारायण मंदीर चौक, रात्री ९.१० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असे स्वागत होत गांधी चौक चंद्रपूर येथे रात्री ९.२० वा. भव्य जाहीर सभेला श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार संबोधणार आहे.
चंद्रपूर महानगरासह जिल्हयाच्या विकासासाठी अभुतपूर्व असा निधी खेचुन आणणारे व चंद्रपूर जिल्हयाच्या विकासाच्या मार्गावर अग्रेसर करणारे लोकनेते श्री. सुधीरभाऊंच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठया संख्येने या स्वागत तसेच सत्कार कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, नामदेव डाहूले, संजय गजपुरे, कृष्णा सहारे, राजेश मुन, राजेंद गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवि गुरनुले, सौ. अंजली घोटेकर, विशाल निंबाळकर, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर राहूल पावडे, संदीप आवारी, आशिष देवतळे, अल्का आत्राम आदी भाजपा पदाधिका-यांनी केले आहे.