शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 2 निदेशकांना 12 हजार रुपयांची लाच घेताना अटक

0
56

चिमूर – मानधन काढून देण्याच्या अटीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे गटनीदेशक व निदेशक यांनी चित्रकला निदेशकाला 12 हजार रुपयांची लाच मागितली .
लाच स्वीकारताना दोघांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे . फिर्यादी हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे तासिका मानधन तत्वावर चित्रकला निदेशक म्हणून कार्यरत आहे .फिर्यादी यांचे माहे फेब्रुवारी ते मे महिन्या पर्यंतचे वेतन थकले होते , ते वेतन काढून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर गट निदेशक म्हणून कार्यरत शांताराम किसनदास राठोड व निदेशक प्रशांत वसंतराव वांढरे यांनी फिर्यादीला वेतन काढून देण्याच्या अटीवर 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली . फिर्यादी यांनी याबाबत 11 ऑगस्टला चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली . तक्रारीची पडताळणी झाल्यावर गुरुवार 18 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन्ही निदेशकाना रंगेहात अटक केली . सदरची कार्यवाही पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले , नरेश ननावरे , संदेश वाघमारे , अमोल सिडाम , रवी कुमार ढेंगळे , मेघा मोहूर्ले व सतीश सिडाम यांनी यशस्वीपणे पार पाडली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here