जर्मनीतील आयर्नमॅन स्पर्धेत चंद्रपूरचे नाव लौकिक करणा-र्या डाॅक्टरांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार

0
53

जर्मनी येथे नुकत्याच पार पडलेल्या आयर्नमॅन 2022 या स्पर्धेत चंद्रपूरातील डाॅक्टरांनी यश संपादित करत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जगपातळीवर लौकिक केले आहे. या सर्व डाॅक्टरांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी सत्कार केला. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दारयंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगांवकरआदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथेअल्पसंख्याक विभागाचे शहर प्रमुख सलिम शेखयुथ शहर प्रमुख राशेद हुसेनबंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारेयुवती प्रमुख भाग्यश्री हांडेआशा देशमुखगौरव जोरगेवारचंद्रशेखर देशमुख आदिंची उपस्थिती होती.
शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक चपळतेची कठीण समजली जाणारी आयर्नमॅन ही स्पर्धा जर्मनीतील ड्यसबर्ग येथे घेतली जाते. यंदा या स्पर्धेत चंद्रपूरातील डाॅक्टरर्स आणि पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यात १.९१ किलोमीटर पोहणे९१ किलोमिटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे हे तिन प्रकार होते. या तिन्ही प्रकारात चंद्रपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्नित डाॅक्टरांनी पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. याची दखल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी घेत सदर सर्व पुरस्कार प्राप्त विज्येत्यांचा सत्कार केला आहे. यावेळी आ. जोरगेवार म्हणाले किडॉक्टरी व्यवसाय हा अतिशय व्यस्त आहे. अशी व्यस्त दिनचर्या असूनही खेळासाठी वेळ काढत डाॅक्टरांनी मिळविलेले हे यश कौतुकास्पद आणि अनेकांसाठी प्रेरणादाई आहे. चंद्रपूरचा युवक आता क्रिडा क्षेत्रात रुची दाखवू लागला आहे. अनेक खेळ प्रकारात चंद्रपूरचा खेळाडू उत्तम कामगिरी बजावत आहे. अशात या डाॅक्टरांनी जर्मनी येथे जाऊन संपादीत केलेले हे यश या खेळाडुंसाठी सुध्दा प्रेरणादाई ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी सत्कारमुर्ती म्हणून डॉ. सचिन भेदेडॉ प्राजक्ता अस्वारडॉ कल्पना गुलवाडेडॉ. गुरुराज कुलकर्णीडॉ. अभय राठोडडॉ. रितेश दिक्षितडॉ प्रसाद पोटदुखेडॉ. अमित देवईकरपोलिस कर्मचारी संदिप बल्की यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शालश्रीफळ, पुष्पगुच्छ आणि फोटो फ्रेम देऊन विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here