चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेवर मागील पाच वर्षे भाजपची सत्ता होती. या काळात भाजप पदाधिकाऱ्यांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. आता निवडणूक तोंडावर असल्याने आपले पाप झाकण्यासाठी आयुक्तांच्या अडीच वर्षांच्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे. त्यामुळे राज्य शासनाने महानगरपालिकेतील केवळ अडीच वर्षांचीच नव्हे, तर मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची स्वप्ने भाजपने चंद्रपूरकर जनतेला दिली. चंद्रपूरकर जनतेने विश्वास टाकत भाजपला स्पष्ट बहुमत दिले. त्यानंतर सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी केवळ भ्रष्टाचारयुक्त कारभार सुरू केला. अमृत योजना घोटाळा, कचरा निविदा घोटाळा, प्रसिद्धी घोटाळा, कोरोना काळात डब्बे घोटाळा, प्रसिद्धी फलक घोटाळा, कृषक जमिन अकृषक करणे असे अनेक वादग्रस्त निर्णय मागील पाच वर्षांत घेतले गेले. त्यामुळे चंद्रपूरकर जनतेचा भ्रमनिराश झाला. जनतेच्या मनात भाजप सत्ताधाऱ्यांविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मनपा आयुक्तांनी मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक गैरकारभार केले, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांचा आहे. परंतु, याच पदाधिकाऱ्यांच्या हातात सत्तेची सुत्रे होती. यानंतरही भाजप पदाधिकाऱ्यांना आयुक्ताने केलेल्यागैरकारभार प्रचिती येण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागावा, ही बाब अनाकलनीय आहे. महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांत होणार आहे. त्यामुळे आपली डागाळलेली प्रतीमा उंचावण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप पदाधिकाऱ्यांनी या तक्रारीच्या माध्यमातून केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी केवळ अडीच वर्षांच्या गैरकारभाराची चौकशी केली आहे. तर, काँग्रेसच्या वतीने मागील सत्ता काळातील पाच वर्षात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचेही श्री. तिवारी यांनी म्हटले आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793