*कोंबड्यांच्या बेंद्यात अडकला बिबट*

0
30

वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्यास केले पिंजऱ्यात जेरबंद शहरातील खापरी वार्डातील घटना.

भद्रावती : शहरातील खापरी वार्ड येथील साई नगर येथे निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरी असलेल्या पाळीव कोंबड्यांच्या कोठोड्यात ( बेंड्यात ) पहाटे साडे 4 वाजताच्या सुमारास अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केल्याने तो अखेर तो तेथे अडकला . त्यामुळे त्या परिसरात चांगलीच खळबळ माजली . दरम्यान बिबट्याने कोठोड्यात असलेल्या काही कोंबड्यांना आपले भक्ष बनविले . या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाची चमू , इको – प्रो , सार्ड , आरआरआर व आरआरटी च्या चमूने दाखल होऊन सकाळी 5 ते साडे 10 वाजेपावेते रेस्क्यु टीम ऑपरेशन राबऊन अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले . वैद्यकीय तपासणी करून त्यास भद्रावती वनपरिक्षेत्रातील जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले .
सदर बिबट हा अडीच वर्षीय असून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक निकिता चौरे , वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे इको – प्रोचे संस्थापक बंडू धोतरे , संदीप जीवने , अमोल दौलतकर , दीपक कावटी व त्यांची चमू सार्डचे अनुप येरणे व त्यांची चमू आरआरआर व आरआरटी या टीमने रिस्क्यू ऑपरेशन मोहीम राबऊन तब्बल साडे 5 तासानंतर अखेर बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद केले . पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर बिबट्या निसर्गमुक्त करण्यात आले . यामध्ये रविकांत खोब्रागडे , भद्रावती वन परिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे , बीट वनसंरक्षक धनराज गेडाम , वनरक्षक , वन कर्मचारी , वन मजूर सार्डचे इम्रान खान , अमोल कुचेकर , सोनू कूचेकर , प्रणय पतरांगे , पंकज कूचेकर , इको – प्रोचे संदिप जीवने , अमोल दौलतकर , दिपक कावठी आदींचे सहकार्य लाभले .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 98812777930

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here